शिंदे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी?

शिंदे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी?

Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी आजही कोणीच विसरलं नाही. त्यातच आता दुपारचा शपथविधी झाला आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar)नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजितदादा राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा बंड पुकारलं आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपथविधी गाजणार आहे. ( There is only one DCM in Shinde Government Devendra fadanvis will in Delhi )

Maharashtra Politics : ज्यांना कंटाळून शिंदे गट फुटला; त्याच अजितदादांसाठी घातल्या पायघड्या!

मात्र अशी देखील माहिती समोर येत आहे की, शिंदे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे अधीच उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं काय होणार त्यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशी देखील चर्चा सुरू आहे. कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते शासन आणि प्रशासनावर कमांड असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सत्ता समतोल राखण्यासाठी फडणवीस यांची दिल्लीत रवानगी होण्याची शक्यता आहे. असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे आता नेमक काय होणार? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

Breaking News : अजित पवारांसोबत नगर जिल्ह्याचे ‘हे’ तीन आमदार राजभवनात

राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे गेले. येथे ते त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांचा छगन भुजबळ यांच्यासह शपथविधी झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ, दिलिप वळसे पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेचे अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. मात्र तो शपथविधी राजकीय वर्तुळात अद्यापही चर्चेत असतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. हे सरकार तसं अत्यल्प काळ टिकलं पण तरीदेखील या सरकारला आजही कोणी विसरलं नाही. त्यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रावादीमधील बहुतेक आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सकाळच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी गाजणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube