Breaking News : अजित पवारांसोबत नगर जिल्ह्याचे ‘हे’ तीन आमदार राजभवनात
Ajit Pawar News : राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पुन्हा एकदा बंडाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन हे मुंबईमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील तीन आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहे. यामध्ये संग्राम जगताप, किरण लहामटे, व निलेश लंके हे तिघे जण उपस्थित असल्याची माहिती समजते आहे.
आगामी काळात विधानसभा व लोकसभा निवडणुका या आहेत. मात्र त्यापूर्वीच एक मोठी राजकीय घडामोड हि राज्यात आज घडली आहे. राज्याच्या राजकारणात आज नवा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करत राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान अजित पवार हे राजभवनात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी अजित पवार यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी पक्षाकडे मागितली होती. यासाठी पवार यांनी 1 जुलैपर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. मात्र यावर काही एक निर्णय न झाल्याने आज अचानक अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर तातडीची बैठक बोलवली. या बैठकीला अनेक आमदारही उपस्थित होते. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे समजते.
यामध्ये नगर शहराचे संग्राम जगताप, पारनेरचे निलेश लंके व अकोलेचे किरण लहामटे हे आमदार सध्या अजित पवार यांच्यासोबत मुंबईमध्ये आहे. हे तिन्ही आमदार सध्या राजभवनात दाखल झाले आहे. नगर जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन अजित पवारांबरोबर आहेत तर कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार व प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांसोबतच आहे.