बीबीसीच्या माहितीपटाविरोधातील ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. बीबीसीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावरून देशभरात अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला होता.
त्याच पार्शभूमीवर सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनातही याच्या विरोधातला ठराव मंजूर करण्यात आला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत हा ठराव मांडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव मतदानाला टाकला असता एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
Sanjay Gandhi : राहुल गांधींच्या काकांनाही झाली होती २ वर्षांची शिक्षा, हा चित्रपट ठरलं होतं ‘कारण’
काही महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे. दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीबीसीचा संबंधित माहितीपट यूट्यूब (YouTube)आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे बीबीसी डॉक्युमेंटरी शेअर करणारे ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ट्विटद्वारे बीबीसी डॉक्युमेंटरीची यूट्यूब लिंक शेअर करण्यात आली आहे ती देखील ब्लॉक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत सूचना जारी केल्या आहेत.
‘चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का?’ सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र
बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ (India: The Modi Question) नावाचा माहितीपट बनवला. या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्ये गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली या घटनांशी संबंधित राजकीय नेते, पत्रकार आणि पीडित लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे.