‘चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का?’ सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र

‘चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का?’ सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : देशातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष हा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. विरोधकांना अडचणीत आणण्याची एकही संधी देशातील सत्ताधारी सोडत नाहीत, अशी टीका भाजपवर वारंवार होत असते. भारत जोडो यात्रेनंतर सत्ताधारी कायम कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) अडणचीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. संसदेत कॉंग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद घमासाम होत असते. अशातच आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. लोकसभा अध्यक्षांना घेतलेल्या या निर्णयाने देशभरात एकच खळबळ उडाली असून या निर्णयावरून केंद्र सरकारवर चौफेर टीकेची झोड उठली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही या निर्णयावरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का? अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली.

मोदी या आडनावासंदर्भात टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात दोषी ठरल्यानंतर त्यांना सुरत येथील कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांच्यावर लोकसभा अध्यक्षांकडून अपात्रतेची कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे कॉंग्रेससह अन्य विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं. राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका विरोधक करत आहेत. तर आता सामनातूनही चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का? अशा शब्दात सरकारवर टीका करण्यात आली.

Corona : चिंता वाढली, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 1700 च्या वर, तिघांचा मृत्यू 

या अग्रलेखात म्हटलं की, मोदींनी सध्याचा काळ हा अमृतकाल असल्याचे सांगितलं. मात्र या अमृतकालात चोरांना चोर म्हटले आहे म्हणून शिक्षा ठोठावली गेली आणि चोरांना सजा मिळाली नाही. गौतम अदानी व मोदी भाई भाई, देश लुट कर खाई मलई अशा घोषणा सध्या संसदेत दणाणत आहेत व दोन आठवड्यापासून संसद बंद पडली आहे. देश लुटणाऱ्या अदानीवर कारवाईचे नाव नाही, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर कोर्टाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडली अशी टीका सामनातून करण्यात केली.

दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखविला आहे. चोरांना चोर म्हणण्याचे धाडस राहुल गांधी यांनी दाखविल्यामुळे घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर कारवाईची ही मर्दुमकी दाखवली, असा टोलाही सरकारला लगावला.

नेमकं काय म्हटलं अग्रलेखात

या अग्रलेखात सागंण्यात आलं की, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखविला आहे. चोरांना चोर म्हणण्याचे धाडस राहुल गांधी यांनी दाखविल्यामुळे घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर कारवाईची ही मर्दुमकी दाखवली आहे. सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी कर्नाटकतील एका प्रचार सभेत विचारला होता. त्यामुळे मोदीनामाची मानहानी झाली, असे ठरवून गुरजरातमधील एक वेगळेच मोदी सुरत न्यायालयात गेले. सुरतच्या न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. गांधी यांना न्यायालयाने माफी मागून प्रकरण मिटवा असा पर्याय दिला. पण गांधी यांनी माफी मागितली नाही व जामिनावर मुक्त होऊन सुरतच्या निकालाला आव्हान देण्याचा पर्याय स्वीकारला. निकालानंतर राहुल गांधींचे असे म्हणणे की, सत्य हाच माझा ईश्वर आहे. पण आजच्या युगाव सत्य आणि ईश्वर अशा दोघांवरही संकटाची तलवार लटकत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सध्याचा काळ हा अमृतकाल असल्याचे सांगितले. पण या अमृतकालात चोरांना चोर म्हटले आहे म्हणून शिक्षा ठोठावली गेली आणि चोरांना सजा मिळाली नाही. गौतम अदानी व मोदी भाई भाई, देश लुट कर खाई मलई अशा घोषणा सध्या संसदेत दणाणत आहेत व दोन आठवड्यापासून संसद बंद पडली आहे. देश लुटणाऱ्या अदानी यांच्यावर कारवाईचे नाव नाही, मात्र, चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर न्यायालयाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडली आहे. मात्र, राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही व बेडरपणे शिक्षेला सामोरे गेले. माफी मागायला ते काही सावरकर नाहीत, असा खोचक टोलाही लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube