Santosh Deshmukh murder case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात स्थापन केलेली एसआयटी आज बीड जिल्ह्यात दाखल झाली. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात १० जणांची टीम या प्रकरणांचा सखोल तपास करणार आहे. एसआयटीच्या स्थापनेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आज बसवराज तेली आणि त्यांची टीम बीडमध्ये दाखल झाली व तपासाला वेग आला.
Dulal Sarkar : ममता बॅनर्जीच्या जवळच्या नेत्याला गोळ्या झाडून संपवलं
एसआयटीच्या पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून तब्बल पावणे दोन तास बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांची चौकशी केली. त्यानंतर बसवराज तेली हे बीड शहर पोलीस ठाण्यातून पुढील कामासाठी रवाना झाले.
पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमांनी बसवराज तेली यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केली. तेव्हा बसवराज तेली यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे. मी काहीही बोलणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. वाल्मिक कराड याच्यापूर्वी आरोपीच्या अनेक नातेवाईकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्यां प्रकरणाला २३ दिवस होऊनही अद्याप तीन आरोपी फरार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एसआयटीची घोषणा केली होती. आज सकाळी एसआयटीची टीम बीड जिल्ह्यातील केजमध्ये दाखल झाली आणि संध्याकाळी बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. सध्या पुढील कारवाई सुरू आहे. गृह विभागाकडून अधिकृत आदेश आले असल्याची माहिती आहे.
अशी असेल एसआयटीचं पथक
– आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षक
– अनिल गुजर – पो. उप अधीक्षक
– विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
– महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक
– आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
– तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक
– मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार
– चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक
– बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक
– संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई