Download App

अनिक्षा जयसिंघानी प्रकरणी राज्य महिला आयोगाने दिलं स्पष्टीकरण…

पुणे : अनिक्षा जयसिंघानी प्रकरणाची कुठलीही तक्रार आमच्याकडे आलेली नसून तक्रार आल्यास निश्चितपणे भूमिका घेणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिलं आहे.

काळजी घ्या! राज्यात पुन्हा कोरोना वाढतोयं, दोघांचा मृत्यू…

अनिक्षा जयसिंघानी आणि अनिल जयसिंघानीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी आणि अनिल जयसिंघानी यांनी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक

या प्रकरणाचा संपूर्ण तपास आधीपासूनच पोलिस यंत्रणेकडे आहे. ज्या प्रकरणांमध्ये पोलिस लक्ष देत नाहीत. अशा घटनांची राज्य महिला आयोग दखल घेऊन पोलिसांना पाठपुरावा करुन अहवाल सादर करण्याबाबत आयोगाकडून सूचना केल्या जात असल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच अनिक्षा जयसिंघानी प्रकरणी आमच्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. ज्या प्रकरणाची आमच्याकडे तक्रारच दाखल झालेली नाही त्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही. कारण पोलिस यंत्रणा काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

Balasaheb Thorat : तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांनी मारले तर चालेल का?

या प्रकरणात पोलिस यंत्रणा आधीपासूनच तपास करीत आहे. त्यामुळे महिला आयोगाने लक्ष घालणं बरोबर नसून आयोगाकडे तक्रार आल्यास आयोग निश्चितपणे भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Tags

follow us