Marathwada Liberation War : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाला नव्हता. मराठवाड्यातील जनतेने स्वातंत्र्यासाठी संघर्ष केले आणि अखेर या अभूतपूर्व लढ्याला यश मिळाले आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा (Marathwada Liberation War) निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. या घटनेला 17 सप्टेंबरला 76 वर्षं पूर्ण होत आहे. त्यामुळे 75मिनिटांचा नाट्य माहितीपट ‘मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ येत्या 16 सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर दु.2.00 वाजता प्रसारित होणार आहे. हे माहितीपट पाहावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे.
महामंडळाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय पुरकर, समीर विद्वान्स, समीर धर्माधिकारी, सचिन देशपांडे, श्रीकांत भिडे, अभिजीत श्वेतचंद्र, अक्षय वाघमारे, पूजा पुरंदरे, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, ऋतुजा बागवे, दिप्ती धोत्रे, विराजस कुलकर्णी, आस्ताद काळे, आदिनाथ कोठारे, आशुतोष वाडेकर यांनी या माहितीपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
तर मराठवाड्यातील मुक्तिसंग्रामाचा ऐतिहासिक कालखंड सर्वांना पाहता यावा यासाठी विविध माध्यमातून या माहितीपटाचे प्रसारण करण्याचे नियोजन सरकारने केले आहे यातील एक भाग म्हणजे सहयाद्री वाहिनीवर प्रेक्षपण अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली.
आमची सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करतो, उद्धव ठाकरेंची कर्मचाऱ्यांना ग्वाही
इतिहास हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि या माहितीपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांचा संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. या माहितीपटात तगड्या कलाकारांनी भूमिका साकारली असून यानिमित्ताने आम्ही मुक्तीसंग्राममध्ये सहभागी झालेल्या वीरांना आदरांजली वाहात आहोत. असं या माहितीपटाचे दिग्दर्शक दिग्पाल सुनिल लांजेकर म्हणाले.