Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. दुसरीकडे वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे, काल दिवसभर मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये झालेल्या घोषणाबाजीनंतर आज (रविवारी) ठिकाणी तणावाचं वातावरण निवळलं असल्याचं दिसून येत आहे, तर आंतरवली सराटीमध्ये ॲड मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
चालतानाच कोसळले; मनोज जरांगेंची तब्येत खालावली; मंत्री शंभूराजे देसाईंची उपचार घेण्याची विनंती
वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती
वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलकांनी काल रस्ता रोको केला. त्यामुळे त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांकडून रास्ता रोको केला जात होता. पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशी हुज्जत देखील घातली जात होती. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रात्रीपासूनच अंतरवाली सराटी जवळ चोख बंदोबस्त ठेवला.
आज परभणी बंद
सकल मराठा समाजाकडून विविध ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देत आज सकल मराठा समाजाच्यावतीने परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ आज बंद असणार आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच आज बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.
आजपासून पावसाचे धुमशान! या जिल्ह्यांत जोरदार बरसणार; वाचा हवामानाचा अंदाज
ओबीसीतून आरक्षण
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी एक वर्षांपासून ते आरक्षणाच्या माध्यमातून लढा देत आहेत. याआधी अनेकदा आंदोलन केल्यानंतर सत्तेतील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरेचे अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला होता. यानंतरही पुन्हा उपोषण करण्यात येत आहे.