देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शाह यांनी भाजपची कमान सांभाळल्यापासून भाजपच्या निवडणूक प्रक्रियेत सर्व्हे, अहवाल यांचं महत्व वाढलं आहे. त्यामुळे भाजपचे कोणताही निर्णय होण्यापूर्वी त्यांचा सर्व्हे काय सांगतोय? हे लक्षात घेतलं जात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी या सर्व्हेच्या पद्धतीची मोठी धडकी घेतली आहे.
सध्या राज्यात जो राजकीय संघर्ष दिसतो आहे, त्याच्या मागे देखील त्यांचा एक अहवाल असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपने काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुका आणि राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली होती. भाजप केंद्रीय नेतृत्वाने याची जबाबदारी राज्यातील नेते विनोद तावडे यांच्यावर टाकल्याची माहिती मिळते आहे. एका वृत्तवाहिनीने तशी माहिती दिली आहे.
विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने सर्व्हे केला. समितीने विविध राज्यातील स्थानिक पदाधिकारी, अभ्यासक व विश्लेषक यांच्याशी चर्चा करत माहिती गोळा केली. त्यानंतर प्रत्येक राज्यानुसार आपला अहवाल तयार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात नकारात्मक स्थिती असल्याचे विनोद तावडे समितीच्या अहवालात सांगण्यात आलं होत.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात समितीने सांगितले आहे की 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये दुहेरी आकड्यात पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.
भाजप प्रवेशावर काय म्हणाले अजितदादा? वाचा 10 मुद्द्यांमध्ये