Sanjay Raut on Waqf Board and BJP : आज लोकसभेत वक्फ बोर्ड सुधरणा विधेयक मांडलं जाणार आहे. मात्र, यावर काँग्रेस पक्षासह अनेक प्रादेशिक पक्षांनीही टीका करण्यास सुरूवात केली आहे. (Waqf) भाजप स्वत:च्या मर्जीने हे सगळ करत आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटानेही जोरदार प्रहार केला आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपला वक्फ बोर्डाच्या मुद्यासह हिंदूत्वावरून चांगलाच टोला लगावला आहे.
आज वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत; विरोधक आक्रमक होणार, वाचा, कुणाकड किती संख्याबळ?
भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत फिरतोय या देशात. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व अजिबात शिकवू नये. किंबहुना वक्फ सुधारक बील आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. वक्फ बील संदर्भात जे बील आले आहे त्यात सरकार काही बदल करू पाहत आहे. मात्र, त्या बिलाला देशातील फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे या बिलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ( RSS)चा पण पूर्णपणे पाठिंबा नाही अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केलाय.
त्याचबरोबर देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची. राहिला विषय राहुल गांधींचा. तर, त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता. पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता. तुमच्यात हा दम आहे का? असा थेट प्रश्नच राऊतांनी उपस्थित केला आहे.
काय आहे वक्फ विधेयक
हे विधेयक केंद्रीय वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डाच्या रचनेत बदल करून गैर-मुस्लिम सदस्यांना समाविष्ट करते. जिल्हाधिकाऱ्यांनी वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार देऊन सर्वेक्षण आयुक्तांची बदली केली आहे. वक्फ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकारी मालमत्तेचे वक्फ करणे बंद होईल.