राज्यात तालिबानी राज्य, थर्ड डिग्रीवरून मंत्री शंभूराज देसाईंवर संजय राऊत भडकले

राज्यात तालिबानी राज्य, थर्ड डिग्रीवरून मंत्री शंभूराज देसाईंवर संजय राऊत भडकले

Sanjay Raut On Shambhuraj Desai : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात एका कार्यक्रमात गाणं म्हटल्याने शिंदे गटाकडून आक्रमक भूमिका घेत कुणाल कामरा (Kunal Kamra) याला अटत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.  या प्रकरणात बोलताना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी कुणाल कामरा याला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ असा इशारा दिला आहे तर आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही सगळे सत्तेची मस्ती आहेत. जर कोणी तुम्हाला दुखावणारं व्यक्तव्य केलं तर त्यासाठी कायदा आहे, आमच्यावर देखील आरोप आहेत आम्ही कोर्टात जातो. कोणी थर्ड डिग्री द्यायचा प्रयत्न करत असेल तर या राज्यात तालिबानी राज्य आहे का? त्या राज्यांमध्ये गद्दारांना कुठली शिक्षा देतात हे माहित आहे का? गद्दारांना भर चौकात उघड करून फटके मारले जातात. जर कुणाल कामराला त्या पद्धतीची शिक्षा देत असाल तर गद्दारीचे शिक्षा 100 फटके आणि फासावर लटकवण्याची आहे ही मान्य आहे का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांना विचारला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्यावर देखील टीका होत्या, तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता. पूर्वाश्रमी आमच्याकडून देखील अशा चुका झालेल्या आहेत. पण आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नियम पाहायला पाहिजे. शिंदे गट कुठलीही मागणी करू शकतात. ते रेड्याचं दूध काढू शकतात, बैलाचे दूध काढू शकतात. या देशात आम्ही काही प्रमाणात स्वातंत्र्य टिकवून ठेवलेलं आहे. तुमच्यावर काही टिपणी केली म्हणून एखाद्याचा चॅनल बंद करायचा. उद्या जर सरकार बदललं आणि तुमच्या विरोधातील कार्यकर्ते यांनी हीच भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं? असं देखील संजय राऊत म्हणाले.

तसेच शिंदेंच्या कार्यकर्त्यांना त्यांचा देश अमित शाह यांच्या पलीकडे दिसत नाही. जोपर्यंत अमित शाहा यांचे छत्र त्यांच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत त्यांची भाषा चालेल पण रामकृष्ण आले गेले तसे मोदी, शाह येतील आणि जातील हा इशारा मी त्यांना देतो. असेही राऊत म्हणाले.

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून एफडी, लाभांश अन् लॉटरीवरील आयकर नियम बदलणार, जाणून घ्या सर्वकाही

तर दुसरीकडे या प्रकरणात कुणाल कामरा याला चौकशीसाठी खार पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स पाठवला असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. मात्र आतापर्यंत कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिलेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube