कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ; शंभूराज देसाई संतप्त

कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ; शंभूराज देसाई संतप्त

Shamburaj Desai Warn to Kunal Kamra On Eknath Shinde Song Case: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने (Kunal Kamra) गाणं म्हटल्याने राज्यातील राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.यात आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील कुणाल कामराला कडक इशारा दिला आहे. यावेळी बोलताना देसाई यांनी थेट कामराला थर्ड डिग्री देण्याचं म्हटलं आहे.

सलमान खानच्या बिग बजेट सिनेमाला ब्रेक! ‘टायगर वर्सेस पठाण’ स्थगित

यावर बोलातना देसाई म्हणाले की, शिंदेंवर कामराने केलेल्या विधानानंतर राज्यात शिवसैनिक संतप्त झाले आहेत.त्याला त्याच्या स्टुडीओमध्ये जाऊन शिवसैनिकांनी शिंदेंवर बेताल वक्तव्य केल्याने प्रसाद दिला आहे. मात्र तरी देखील तो एक मागोमाग एक व्हिडीओ पोस्ट करत आहे. तर या अगोदर त्याने पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री सीतारमन आणि सुप्रीम कोर्ट यांची देखील खिल्ली उडवलेली आहे.

IMD अलर्ट! पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडणार, ‘या’ जिल्ह्यांत…

त्यामुळे त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता त्याने फक्त कुठे भेटायचे ते सांगावे आम्ही त्याला आमच्या भाषेत उत्तर देऊ. टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ. मात्र शिंदे साहेबांनी सांगितलेले असल्याने शिवसैनिक गप्प आहेत. असं वक्तव्य देसाई यांनी केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राच्या सध्या राजकारणावर एक कविता सादर केली. या कवितेच्या माध्यमांतून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याने आपल्या कवितेत म्हटले की, ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….

थेट राज्य सचिवांना पत्र अन् पोलिसांवर गंभीर आरोप करत स्वारगेट प्रकरणातील पिडीतेची मोठी मागणी

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधातील गाण्यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी महायुतीने या प्रकरणात कुणाल कामरा याला अटक करुन कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे तर महाविकास आघाडीकडून कुणाल कामरा याला समर्थन देण्यात येत आहे. तर कुणाल कामरा याने देखील या प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला आहे. मी माफी मागणार नाही पण न्यायालयाने माफी मागण्यास सांगितली तर माफी मागेन असं कुणाल कामरा याने एका सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube