विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात मागील चोवीस तासात वर्धा येथे उच्चांकी ४३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

News Photo   2026 05 06T174244.600

विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामानाने (Weather) उकाडा वाढला आहे. कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरीही दुपारचा उन्हाचा चटका मात्र अंगाची लाही करत आहेत. तर काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकणात आज उष्ण व दमट हवामानाचा तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजा, वादळी वारे आणि गारपीटीसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

आज मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजा आणि गारपीटीसह पावसाचा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Sugarcane FRP : वाढलेली एफआरपी कोणाच्या खिशात जाते ?

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून सिंधूदुर्ग जिल्ह्यात उष्ण-दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडटासह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राज्यात मागील चोवीस तासात वर्धा येथे उच्चांकी ४३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल अमरावती ४२.८ अंश सेल्सियस, अकोला, ४२.५ अंश सेल्सियस आणि ब्रह्मपुरी येथे ४२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे किमान १५.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते दिवस कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज असून कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Exit mobile version