Download App

आधी लोकसभेचा प्रचार करा : फडणवीसांनी पाटलांना दटावले; ‘शब्दाविनाच’ करावे लागणार अजितदादांचे काम

मुंबई : “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा”, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. काल (24 मार्च) रात्री उशीरा सागर बंगल्यावर फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे आता कोणत्याही शब्दाशिवायच पाटील यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. (there was a discussion between Devendra Fadnavis and Harshvardhan Patil at Sagar Bungalow late at night.)

आधी विधानसभेचा शब्द द्या, मगच लोकसभेचे काम करणार अशी मागणी पाटील यांनी केली होती. मात्र दत्तात्रय भरणे यांच्यारुपाने इंदापूर हा अजित पवार यांचा हक्काचा बालेकिल्ला तयार झाला आहे. भरणे यांनी इथून दोनवेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजय मिळविला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पाटील यांच्यासाठी कसा सोडायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यासाठी पाटील यांच्यासोबत चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी स्वतः बैठक घेतली होती. मात्र तोडगा निघू शकला नव्हता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढणे हे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मोठे आव्हान बनले होते.

शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान, त्यांचा राजकीय अंत जवळ; मिटकरींचा पलटवार

आता अखेर फडणवीस यांनी दटावण्याच्या स्वरात येऊनच “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा,” असे पाटील यांना निर्देश दिले आहेत. बारामतीतील महायुतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी काम करा. महायुतीच्या उमेदवारा विरोधात कोणताही प्रचार करू नका. समर्थकांनाही तशी समज द्या, असे निर्देश त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिले आहेत. यावेळी पाटील यांनी आपल्याला विरोधी गटाकडून अर्थात राष्ट्रवादीकडून धमक्या येत असल्याच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले. त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Lok Sabha Election : सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते ‘रणसंग्राम’, BJPची दोन खासदारांना पुन्हा उमेदवारी

शिवतारांचे तलवार कशी म्यान होणार?

एका बाजूला हर्षवर्धन पाटील यांचा विरोध असतानाच दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. अजित पवारांवर टीका करत शिवतारे यांनी बारामतीमधून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारेंना यांची समजूत काढली पण त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी आता अपक्ष उभे राहण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी नुकतीच भोरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेटही घेतली.

follow us