Legislative Council Counting : पूर्ण आत्मविश्वास होता, शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार – ज्ञानेश्वर म्हात्रे

रायगड : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. त्यांच्या या विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, ‘हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा विजय आहे. गेल्या सहा वर्षांपासून जे काम आम्ही केलं होत त्या कामाची पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मला पूर्ण आत्मविश्वास होता, शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार आहे.’ ‘त्यासाठी […]

Untitled Design   2023 02 02T140926.569

Untitled Design 2023 02 02T140926.569

रायगड : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. त्यांच्या या विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, ‘हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा विजय आहे. गेल्या सहा वर्षांपासून जे काम आम्ही केलं होत त्या कामाची पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मला पूर्ण आत्मविश्वास होता, शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार आहे.’

‘त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले या तिघांनी मला महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित केलं होत. तब्बल 33 संघटनांचा मला पाठिंबा होता. मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या प्रचाराची धुरा सांभाळली. मंत्री दिपक केसरकर, मंत्री उदय सामंत असतील आमच्या विभागातील सर्व आमदार माझ्या प्रचाराला लागाले होते.’

‘याच कारण असं की, त्यांना विश्वास होता. याने चांगले काम केले आहेत. पुढे जाऊन शिक्षकांचे काम करणार म्हणून या विश्वासाच्या आधारावर आम्ही ही निवडणुक जिंकली आहे. तर वेणू गोपाल कडू यांनी मतांची विभागणी होऊ नये म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन माघार घेतली. हा विजय त्यांचा देखील आहे. त्यांचे ही मी आभार मानतो.’

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतील पहिला निकाल हाती आला आहे. या दोघांनीही तगडा प्रचार केला होता. या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहे. त्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यामुळे आपला विजय झाल्याची घोषणा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे. तर दुसरीकडे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना 9 हजार 500 मते मिळाली आहेत. त्यामुळे शेकाप बराबरच महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. म्हात्रे हे शिवसेनेत होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी उमेदवारी मिळाली.

शेकापला धक्का, जागा हिसकावले
गेल्या निवडणुकीत बाळाराम पाटील हे विजयी झाले होते. २०१७ मध्ये पाटील यांना ११ हजार ८३७ मते मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ६ हजार ६६८७ मते मिळाली होती. आता मात्र म्हात्रे हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते. आता म्हात्रे यांनी पराभवाचे उट्टे काढले आहेत. शेकापला मोठा धक्का आहे. त्या कोकणात शेकापची ताकद कमी होत असल्याचे या वरून दिसून येत आहे.

Exit mobile version