Download App

खरे ‘बदनामिया’ धनंजय मुंडेचं; दादागिरी ते हडपलेली जमीन, दमानियांचं सडतोड प्रत्युत्तर

Anjali Damania On Dhananjay Munde : मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा

  • Written By: Last Updated:

Anjali Damania On Dhananjay Munde : मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज सकाळी केला होता. या आरोपांवर त्यांना शेतीमधील काय कळतं? त्या शेतकरी आहेत का? जेणे करून त्या माझ्यावर कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत आहेत. असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दमानियांना प्रत्युत्तर दिले होते. तर आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची मला गमंत वाटते त्यांना दहशतवादामधला जास्त कळत असेल शेतीतील कळत नसावं. सर्व निर्णय घाईघाईत का घेण्यात आले हे माझा प्रश्न होता मात्र ते म्हणत आहे की, हे मार्चमध्ये घेतले. पण मार्चमध्ये निर्णय जर घेण्यात आला होता तर तुम्ही  नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत झोपले होते का?  मात्र जेव्हा तुम्हाला कळलं की आता लोकसभा येत आहे आणि आपल्याला पैशांची गरज लागणार म्हणून तुम्ही ट्रेन्डर प्रोसेस फेल केलं असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मला जे नाव ठेव्याची ठेवा हसू तुमचं होईल माझं नाही असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या.

बीड उत्तम जिल्ह्या असताना त्याला बदनाम करण्याचा काम धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा अंधारे या लोकांनी केला आहे. यांच्या दहशतवादामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. माझ्यामुळे नाही. खरे ‘बदनामिया’ धनंजय मुंडे आहे. वाल्मिक कराड आहे. सुदर्शन घुले आहे. आम्ही नाही आणि तुम्हाला जी टोपणनाव द्याची आहे आणि ड्रॉमा करून एकादा नाव शोधायचा ही ड्रामेबाजी बंद करा. जर तुम्ही काम केला असता तर चांगले कृषीमंत्री झाले असते असा टोला देखील यावेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना लावला.

करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

follow us