“मंत्री असल्यानेच धनंजय मुंडेंना संरक्षण, वाल्मिक कराड फार..”, आ. क्षीरसागरांचा मोठा दावा
Beed News : धनंजय मुंडे मागील सरकारमध्ये पालकमंत्री असताना एखाद्या कामाचे उद्घाटन करण्याचा अधिकार सुद्धा त्यांनी आम्हाला दिला नाही. कुणीही यायचं आणि नारळ फोडायचं अशी पद्धत बीड मतदारसंघात रुढ झाली होती. कोणत्याही हेडवर कुठेही त्यांनी पैसे सरकवले आहेत आणि ह्याचे पुरावे देखील आहेत. त्यामुळे आता जी चौकशी लावण्यात आली आहे म्हणून अधिकारी देखील घाबरले आहेत.
मी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतोय. अंजली दमानिया देखील पुरावे असल्याशिवाय कधीही बोलत नाहीत. वाल्मिक कराड फार मोठा नाही. त्याला वरदहस्त होता. त्यांना कोण भेटले, कुणी संरक्षण दिले. कुणी अॅडमिट केले या सगळ्यांचे सीडीआर तपासावेत. धनंजय मुंडेंना संरक्षण आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
मुंडेंवर आरोप नसताना राजीनामा..मीच पहिलं बोललो, भुजबळांचं दमानियांना प्रत्युत्तर
क्षीरसागर पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांनी सर्व मतदारसंघातले मुद्दे जाणून घेतले. त्यांच्या कामाची पद्धत पाहता आता जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघात विकासकामांबाबत काहीच अडचण येणार नाही असे वाटते. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याबाबतीत त्यांच्याकडे कागदपत्रे असतील त्याशिवाय त्या बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचे बरोबर असेल असे मला वाटते असे आमदार क्षीरसागर म्हणाले.
पावणे तीन कोटींचे पाच घोटाळे : दमानिया
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले. त्यांच्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एक कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, हे मी पुराव्यानिशी सांगणार असल्याचे सांगत वर्षभराच्या काळात धनंजय मुंडेंनी 275 कोटींचे पाच घोटाळे केल्याचा गंभीर आरोपही दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केला. यावेळी थेट पुरावे दाखवत अंजली दमानिया यांनी महायुतीच्या नेत्यांवर वार केलाय. नॅनो युरिया, नॅनो डीपीएच्या खरेदीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्यात एक बॉटल 220 रूपयांना घेतली, तिची किंमत 92 रूपये होती. हा घोटाळा 88 कोटींचा आहे.
बॅटरी स्प्रेयरवर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, तो आताच्या घटकेला 2400 रूपयाला घेतला जातोय, तर 2900 रूपयांना विकला जातोय. याचं टेंडर कृषीमंत्र्यांनी काढलं, ते 3600 रूपयांना आहे. आपले तत्कालिन कृषीमंत्री यांनी किती पटीने गोष्टी खरेदी केल्या ते पहा. 2 लाख 36 स्पेअर बॅटरी खरेदी केल्या 3000 रूपयाची एक बॅटरी आहे. प्रत्येकी 1275 रूपये जास्त किमतीने हे खरेदी केले.
Video : वर्षभरात पावणे तीन कोटींचे पाच घोटाळे; दमानियांनी बाहेर काढले धनंजय मुंडेंचे प्रताप