Ahmednagar News: जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. आतापर्यंत नागरिकांच्या घरांमध्ये चोरीच्या घटना होत होत्या मात्र आता देवांची मंदिरे देखील चोरट्यांच्या नजरेतून सुटलेली नाही आहे. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. (Ahmednagar news) नुकतेच पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Ahmednagar Crime) हा सर्व प्रकार सुरु असताना चोरट्यांचे हे कृत्य मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Video : देवही असुरक्षित! चोरटयांनी लुटली दानपेटी…चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद#Ahmednagarnews #Ahmednagarcrime #Ahmednagarpolice pic.twitter.com/jfqkT2FqDZ
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 10, 2023
याबाबतची अधिक माहिती अशी, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद केले. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागून चार-पाच अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मंदिरातील चार दान पेट्या उचलून पाठीमागील बाजस नेल्या. मात्र, मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील दानपेटी मात्र चोरट्यांना उचलता आली नाही. त्यामुळे त्यांनी ती दानपेटी सोडून तसेच निघाले.
हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त
दरम्यान मंदिरातून घेऊन आलेल्या चार दान पेट्यांतील लाखो रुपयांसह सोने- चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मात्र, दानपेटीतील चिल्लर तशीच ठेवली. मंदिरामध्ये चोरी झाल्याची माहिती समजताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पथकातील रक्षा, या श्वानाने मंदिरातील पाठीमागील नदीजवळ टाकलेल्या दानपेट्यांपासून तपासाला सुरुवात केली.
श्वानाने पुढे वृद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या राममंदिरापासून पुढे सावरगाव घाट, या डांबरी रस्त्यापर्यंत चोरटे गेल्याची दिशा दाखवली. तिथून पुढे मात्र चोरटे वाहनाने पसार झाले असतील असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान वृद्धेश्वर येथे दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा तपास करून अटक करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. मात्र चोरीच्या घटनेचा भाविक भक्तांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.