Download App

ते आमदार स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेत…विखेंचा शरद पवारांना टोला

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe Speak On Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सेना – भाजपशी सोबत येत सत्तेत सहभागी झाला. त्यांनतर शरद पवार यांनी त्या आमदारांवर टीका करत अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा परत निवडून येणार नाही, असे म्हंटले होते. मात्र हे आमदार स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले आहे. म्हणून कोणी कितीही त्यांच्यावर आरोप केले, चिखल फेक केला व सभा घेतल्या तरी मात्र ते आमदार त्यांच्या कर्तृत्वावर निवडून आले आहे. कोणी भाषणातून अशा अफवा करत असेल की पक्षातून गेलेल्यांचे भवितव्य धोक्यात आहे तर हा त्यांचा गैरसमज आहे. मात्र जनता त्यांचा हा गैरसमज निवडणुकीतून दूर करेल अशा शब्दात खासदार सुजय विखे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. (Those MLAs were elected on their own merits…Vikhe’s toll to Sharad Pawar)

खासदार सुजय विखे हे नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी विखे यांनी शरद पवार घेत असलेल्या सभांवरुन त्यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदारांच्या भविष्याची चिंता आहे, ते पुन्हा निवडून येणार नाही अशी टीका शरद पवार यांनी केली होती. यावर बोलताना सुजय विखे म्हणाले, राज्याच्या विकासासाठी या आमदारांनी वेगळा निर्णय घेत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच हे स्वतःच्या कर्तृत्वावर व लोकांची कामे तसेच आपापल्या मतदार संघाच्या विकासाची कामे या आमदारांनी केली आहे म्हणून यांना जनता निवडून देत आहे. मात्र कोणी अशा अफवा पसरवत असेल किंवा सभांमधून भासवत असेल की या आमदारांचे भवितव्य धोक्यात आहे तर असे काही नाही आहे. हे जे काही लोकप्रतिनिधी आहे ते त्या पक्षातील दिग्गज आहे. ते त्यांच्या विकास कामांद्वारे निवडून येतील. आम्ही भाजपात गेलो तेव्हा देखील असेल बोलले गेले की आमचा पराभव होईल मात्र आम्ही निवडून आलो, अशा शब्दात विखे यांनी नाव न घेता पवारांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळेंनंतर आता भुजबळही सरोज आहिरेंच्या भेटीला; त्या नेमक्या आहेत तरी कुठे?

काँग्रेसचे नेतेमंडळी संपर्कात?
भाजप व शिवसेना युती होऊन राज्यात सरकार स्थापन झाले आहे. नुकतेच आता राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाने देखील आता सत्तेत सहभागी होत भाजप व शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे, यामुळे सध्या भाजपा हाच मोठा पक्ष ठरतो आहे. आता राहिलेले काँग्रेसच्या नेत्यांशी आपण स्मारक साधत आहोत का? यावर बोलताना विखे म्हणाले आम्ही त्यांच्याशी कोणताही संपर्क साधत नाही आहे. मात्र त्यांचे काहीजण वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधत आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क ठेऊन काही उपयोग नाही आहे, असे स्पष्ट मत खासदार सुजय विखे यांनी केले आहे.

Tags

follow us