पुढील दोन दिवस वादळी पावसाचे; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचं आवाहन

Thunderstorms expected अहिल्यानगर जिल्ह्यात 17 ते 19 मार्च 2026 या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व विजांच्या कडकडाटाची शक्यता

Thunderstorms Expected

Thunderstorms Expected

Thunderstorms expected in the district for the next two days; Administration appeals to citizens to be vigilant : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 17 ते 19 मार्च 2026 या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाचा ‘मायेचा’ निकाल! दत्तक बाळालाही मिळणार आईचा पूर्ण सहवास; रजेचा नियम बदलला!

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी 18 व 19 मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

भाजप आमदार मंदा म्हात्रेंना ह्रदयविकाराचा झटका; नवी मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू

वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडांखाली, मोकळ्या मैदानात, विजेचे खांब व लोखंडी कुंपणाजवळ उभे राहू नये. वीज कोसळण्याची शक्यता असल्याने या काळात विजेच्या उपकरणांचा वापर टाळावा व ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे यांसारख्या सुवाहक वस्तूंपासून दूर राहावे.

Donald Trump यांच्या 5 चुका, ज्यामुळे अमेरिका इराणसोबतच्या युद्धात अडकला

घराबाहेर मोकळ्या जागेत अडकल्यास गुडघ्यांवर बसून कान व डोके झाकून सुरक्षिततेची काळजी घ्यावी.जाहिरात फलक कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याजवळ थांबणे टाळावे. धरणे, नद्या व कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये व धोकादायक ठिकाणी फोटो काढणे टाळावे.

पुण्यात फक्त घरपोचच गॅस सिलिंडर मिळणार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

शेतकऱ्यांनी वादळी वारा व पावसापासून शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, तसेच काढणीस आलेला शेतमाल व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर व 0241 – 2323844 या दूरध्वनीवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही गिते यांनी केले आहे.

Exit mobile version