DJ च्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीसांचं पुणेकरांना आवाहन

CM Fadanvis on Ganeshotsav DJ गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर फडणवीसांनीपुणेकर आणि गणेश भक्तांना आवाहन केलं

Devendra Fadanvis

CM Fadanvis on Ganeshotsav DJ related disputes appeals to Punekars : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात यंदा गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुणे महापालिकेच्या बैठकीत विद्याधर बापट यांनी डीजेच्या दणदणाटाला विरोध केल्यानंतर त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावर प्रचंड टीका टिपण्णी झाल्यानंतर आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान करत पुणेकर आणि गणेश भक्तांना आवाहन केलं आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ही बैठक होत असलेला हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एकीकडे आज संकष्टी चतुर्थी आहे. तसेच ज्या पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरूवात केली. त्यात पुण्यामध्ये गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावर मला बाहेर पडल्यानंतर पत्रकार प्रश्न विचारतीलच. त्यावर आताच सांगतो की, सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करण्याची क्षमता फक्त पुणेकरांमध्येच आहे. त्यामुळे DJ च्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा.

राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिनानिमित्त आकुर्डी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात जनजागृती अभियान

follow us