Download App

आज श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवार; श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आजच आल्याने देशात सर्वत्र उत्साह

श्रावण महिन्याला 'सणांचा राजा' असं आवर्जून म्हटलं जाते. आजच्या चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुंदर योग जुळून आला आहे.

  • Written By: Last Updated:

Janmashtami 2024 : श्रावण महिन्याला ‘सणांचा राजा’ असं आवर्जून म्हटलं जाते. (Janmashtami ) कारण, या महिन्यात विविध सण-उत्सव आणि व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. यंदाच्या श्रावणातील आजचा चौथा सोमवार (२६ ऑगस्ट) अर्थात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुंदर योग जुळून आला आहे. आज देशभरात भगवान श्रीकृष्ण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

मोठी दुर्घटना! श्रावण सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी

वैदिक पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असं मानलं जातं. परंतु, यंदा श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारीच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अनोखा योग जुळून आला आहे. भगवान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार असल्याची धार्मिक मान्यता आहे.

आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ; पहिल्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाची खास पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी अर्थात २७ ऑगस्टला(मंगळवारी) गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. आजच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तुम्ही जन्माष्टमीचे शुभेच्छा, संदेश पाठवू शकता. हे शुभेच्छा, संदेश तुमच्या नातेवाईकांना, मित्र-परिवाला पाठवून श्रीकृष्णजयंती उत्साहात साजरी करा.

कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

‘गोपाळा गोपाळा

देवकीनंदन गोपाळा

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त

सर्वांना हार्दिक शुभेच्छा’..!

हाथी घोडा पालखी

जय कन्हैया लालकी,

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

कलेकलेने चंद्र वाढतो, चिमणा नंदाघरी,

जगोद्धारा घरी यशोदा,पाळण्याची दोरी,

कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

‘जसा आनंद नंदच्या घरी आला

तसा तुमच्या आमच्याही येवो

प्रत्येक घरी कृष्णाचा जन्म होवो

जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा’..!

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद

लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास

असा आहे आजचा दिवस खास

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा..!

कृष्ण ज्याचं नाव

गोकुळ ज्याचं गाव

अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम

गोकुळाष्टमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

जन्माष्टमी आली

पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली

कान्हाची किमया न्यारी

दे आम्हाला तू आशीर्वाद

 

follow us

संबंधित बातम्या