आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ; पहिल्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ; पहिल्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

Shravan 2024 : आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांचा प्रिय महिना आहे. या महिन्यात अनेक सण-उत्सव आणि विविध प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात. (Shravan) श्रावण महिना महादेवांना पूर्णपणे समर्पित आहे. श्रावणात भगवान शंकरांची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं.

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; मुंबईला यलो अलर्ट, राज्यातील इतर जिल्ह्यांत काय परिस्थिती?

तांदळाची शिवामूठ

यंदाच्या श्रावणात ५ श्रावणी सोमवार आहेत. त्यापैकी आजच्या या पहिल्या श्रावणी सोमवारी अनेक जण उपवास करतात. महादेवाच्या मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी धान्यांची शिवामूठ वाहिली जाते. ही धार्मिक परंपरा आजही जपली जाते. आजच्या पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहायची आहे. श्रावणात प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याचे महत्व काय? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

काय महत्व आहे?

प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची परंपरा आहे. याला आपण शिवामूठ असे म्हणतो. ही शिवामूठ वाहण्याची धार्मिक परंपरा फार जुनी आहे. खरं तर शिवामूठ हा श्रावणाला मोठा वसा मानला जातो. प्रत्येक मुलीला लग्नानंतर वाटते की, जसे प्रेम आपल्याला माहेरी मिळते, तसंच सासरी देखील मिळावे. सासरच्या लोकांचं आपण आवडतं व्यक्तिमत्व व्हावं, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. सासरच्या लोकांचे आपल्यावर प्रेम वाढावे, यासाठी श्रावणातील एक सण म्हणजे हा वसा आहे. हा वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या लोकांची आवडती बनते. श्रावणातील हा वसा म्हणजे शिवामूठ होय. याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? 20 तारखेला मविआ घेणार मोठा निर्णय

प्रत्येक श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहायची?

  • ५ ऑगस्ट पहिला श्रावणी सोमवार – शिवामूठ तांदूळ
  • १२ ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार – शिवामूठ तीळ
  • १९ ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार – शिवामूठ मूग
  • २६ ऑगस्ट चौथा श्रावणी सोमवार – शिवामूठ जव
  • २ सप्टेंबर पाचवा श्रावणी सोमवार – शिवामूठ सातू

 

टीप – सदर बातमी फक्त सामान्य माहितीसाठी आहे. एक बातमीचा विषय म्हणून आहे. लेट्सअप माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या