Toordal Price Hike : ऐन सणासुदीत डाळी महागल्या आहेत. अगदी दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 170 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरांचे चढे दर वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना मोठी झळ बसणार आहे.
Rajkummar Rao Birthday: एकेकाळी पार्ले-जी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा अभिनेता आता बनलाय सुपरस्टार
…म्हणून देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ
गेल्या वर्षी झालेलं कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये तूरडाळ हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत डाळी महागल्याने सर्वसामान्य नागरिकांना खिशाला कात्री लागणार आहे. तसेच सणांसाठी या डाळींची खरेदी करणं देखील तितकच गरजेच असल्याने त्यांना पर्याय देखील नसल्याचं पाहायला मिळतं.
INDIA Alliance Meeting मध्ये घेतले जाणार ‘हे’ महत्त्वाचे निर्णय; मुंबईची बैठक ठरणार महत्त्वाची
कोण डाळी किती महागल्या?
एकीकडे नुकतचं गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता ऐन सणासुदीत डाळी महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खिशाला कात्री लागणार आहे. त्यामध्ये तूरडाळ 100 रूपांयावरून थेट 160 ते 170 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ 57 ते 70 रुपये किलो झाली आहे. उडीद डाळ 90 रूपायांवरून 110 रूपयांवर गेली आहे. तर मसूर डाळ 58 ते 72 रुपये किलोवर गेली आहे. त्याचबरोबर मूग डाळींच्या दरातही वाढ झाली आहे. मूग डाळ 80 वरून 110 रूपये किलोंवर गेली आहे.