INDIA Alliance Meeting मध्ये घेतले जाणार ‘हे’ महत्त्वाचे निर्णय; मुंबईची बैठक ठरणार महत्त्वाची

INDIA Alliance Meeting मध्ये घेतले जाणार ‘हे’ महत्त्वाचे निर्णय; मुंबईची बैठक ठरणार महत्त्वाची

INDIA Alliance Meeting : देशातून ‘मोदी राज’ उखडून टाकण्यासाठी देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया आघाडीची (INDIA Alliance Meeting ) स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आज (दि.31) आणि उद्या म्हणजेच (दि.1) रोजी पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत. त्यामध्ये कोणकोणते निर्णय होणार आहेत. यावर चर्चा होणार आहे. तसेच ते जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची ही बैठक महत्त्वाची असणार आहे.

Asia Cup मध्ये नेपाळचा पाकिस्तानकडून पराभव; पाकचा पुढील सामना भारताशी

इंडिया आघाडी बैठकीत कोणकोणते निर्णय होणार?

पाटणा, बंगळुरू नंतर आता इंडिया आघाडीची (INDIA Alliance Meeting ) तिसरी बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीमध्ये 2024 च्या लोकसभेच्या जागावाटपावरसविस्तर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार आहे. तसेच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे. आघाडीचे संयोजक कोण असणार हे ठरवलं जाणार, कोऑर्डीनेशन कमिटीची स्थापना केली जाणार, तर काहीं जण या कमिटीची स्थापना आताच करणं घाईचं ठरेल असं म्हणत आहेत.

Devendra Fadanvis यांचा धक्का! अजितदादांची फाईल शिंदेकडे जाण्याआधी फडणवीसांकडे जाणार

तसेच या बैठकीमध्ये दिल्लीतील मुख्य कार्यालयासंदर्भात चर्चा होणार आहे.आघाडीचे (INDIA Alliance Meeting ) प्रवक्ते ठरवले जाणार आहेत. जनतेशीसंबंधित मोर्चे आणि आंदोलनांवर चर्चा होणार, इतर पक्षांना आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यावर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकांवर देखील यामध्ये चर्चा होणार आहे.

26 पक्षांचे 80 नेते उपस्थित राहणार…

मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत (INDIA Alliance Meeting ) 26 पक्षांचे 80 नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये एमके स्टॅलिन, नितीश कुमार, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या पाच मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल हे उपस्थिती दर्शविणार आहेत. या 80 नेत्यांसाठी मुंबईतील हयात हॉटेलमध्ये 170 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. विमानतळावर राष्ट्रवादी-काँग्रेस सर्व नेत्यांचे स्वागत करतील, तर शिवसैनिक हॉटेलवरील व्यवस्थेवर लक्ष देणार आहेत. तुतारी आणि नाशिक ढोलताशाच्या गजरात विरोधकांचे स्वागत करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube