Download App

Parli Train Accident : परळीमध्ये रेल्वे अपघात, मेंढपाळासह 22 मेंढ्या जागीच ठार

Parli Train Accident : बीड (Beed) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, मलकापूर (Malkapur) परिसरात भरधाव

  • Written By: Last Updated:

Parli Train Accident : बीड (Beed) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, मलकापूर (Malkapur) परिसरात भरधाव मालगाडीच्या धडकेत एका मेंढपाळासह 22 मेंढ्या आणि 2 जनावरं जागीच ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. परळी (Parli) शहरापासून जवळ असलेल्या मलकापूर शिवारात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये मुंजा ढोणे (Munja Dhone) या मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मेंढपाळ, मधुकर सरवदे व मुंजा ढोणे (राहणार, धनगर गल्ली, परळी) या दोघांनी आज त्यांच्या मेंढ्या चारण्यासाठी सोडल्या होत्या. चारण्यासाठी मेंढ्या रेल्वे पटरीवरून जात असताना अचानक मलकापूर शिवारानजीक परळी – हैद्राबाद रेल्वे पटरीवर भरधाव वेगातील मालगाडी आल्याने ही दुर्घटना घडली आहे.

Bigg Boss Marathi मध्ये ‘खिलाडी कुमार’ लावणार हजेरी, भाऊचा धक्का होणार एकदम झापुक झुपुक

दोन्ही बाजूंनी डोंगर असल्यामुळे बचावासाठी कोणालाही वेळ मिळाला नाही आणि क्षणार्धात मालगाडीने 22 मेंढ्या आणि दोन जनावरांना चिरडलं. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मेंढपाळ मुंजा ढोणे यांचा मृत्यू झाला आहे तर मधुकर सरवदे यातून बचावले आहे. सध्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Video : हिमाचल प्रदेशात मोठी दुर्घटना, दरीत वाहून गेली इनोव्हा कार, 9 जणांचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

follow us