Download App

18 वर्षात 21 वेळा बदली, तुकाराम मुंडेंची अडचण कोणाला?

Maharashtra IAS Transfer : आयएएस तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी किंवा कामांसाठी महाराष्ट्रात ओळखले जाते. तुकाराम मुंडे (IAS Tukaram Munde Transfer) जेवढे आपल्या कामाने गाजले किंवा लोकप्रतिनिधीबरोबरच्या संघर्षामुळे गाजले त्यापेक्षा जास्त गाजले ते त्यांच्या सततच्या बदलींमुळे. तुकाराम मुंडे 2005 साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 21 वेळा त्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

एखाद्या अधिकाऱ्याच्या इतक्यावेळ्या बदल्या का होतात? किंवा तुकाराम मुंडेंवरच अशी वेळ का येते? सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचे असो किंवा भाजप-शिवसेनचे असो. पण तुकाराम मुंडेंच्या नशिबी कायमच बदल्या होत्या. लोकांमध्ये लोकप्रिय असलेले तुकाराम मुंडे सगळ्यांनाच का खुपतात? दोष तुकाराम मुंडेंच्या कार्यशैलीत आहे की आपल्या व्यवस्थेत. चला तर मग जनतेमध्ये लोकप्रियता लाभलेले तुकाराम मुंडे कोणाला डोईजड होतात ते पाहूया…

तुकाराम मुंडेंच्या आतापर्यंतच्या बदल्या
ऑगस्ट 2005 साली प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर 2007 साली उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
2008 साली सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
2009 साली आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 साली सीईओ, वाशिम
जून 2010 साली सीईओ, कल्याण
जून 2011 साली जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 साली विक्रीकर सहआयुक्त, मुंबई
नोव्हेंबर 2014 साली जिल्हाधिकारी, सोलापूर
मे 2016 साली महापालिका आयुक्त, नवी मुंबई
मार्च 2017 साली मुख्य कार्यकारी अधिकारी पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 साली नाशिक महापालिका आयुक्त
नोव्हेंबर 2018 साली नियोजन सहसचिव
डिसेंबर 2018 साली प्रकल्प अधिकारी एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 साली महापालिका आयुक्त नागपूर
ऑगस्ट 2020 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई, सदस्य सचिव
जानेवारी 2021 साली राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार
सप्टेंबर 2022 साली आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त
29 नोव्हेंबर 2022 साली एक वर्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत
एप्रिल 2023 साली पशुसंवर्धन आणि दुग्धविकास सचिव
2 जून 2023 साली मराठी भाषा विभाग सचिव

तुकाराम मुंडेंच्या कार्यशैलीतील दोष
संवदाचा आभाव
तुकाराम मुंडे हे करड्या शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. पण ज्यावेळी संवाद साधण्याची वेळ येते त्यामध्ये अयशस्वी होतात. संवादाची कला किंवा कौशल्य नाही. आपण भले, आपलं काम भलं आणि नियम भला या उक्तीप्रमाणे त्यांचे काम चालते. राजकारणी असूद्या किंवा आजूबाजूचे अधिकारी. मुंडे कोणशीच व्यवस्थित संवाद साधत नाहीत. अशी तक्रार सातत्याने पुढं येते. त्यांच्या या स्वभावाचा त्यांना अनेकदा फटका बसला आहे.

Joe Root Test Record: रूटने मोडला सचिनचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

लोकप्रतिनिधींशी समन्वयाचा अभाव
तुकाराम मुंडे कोणत्याही अधिकार पदावर गेले तरी आपला कार्यकाळ पूर्ण करत नाहीत. त्यांच्या सातत्याने बदल्या होतात. त्यांच्या बदलीच्या कारणांध्ये स्थानिक लोक प्रतिनिधींशी संघर्ष हे देखील महत्वाचे कारण आहे. मुंडे विरुध्द राजकारणी हे चित्र कायमच दिसलं आहे. आपल्या व्यवस्थेचा गाडा चालायचा म्हटलं तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना हातात हात घालून काम करणं अपेक्षित आहे. याशिवाय दोघांनी पर्याय नाही. कोणतेही काम करताना नेत्यांना अधिकाऱ्यांशिवाय पर्याय नसतो अगदी तसाच अधिकाऱ्यांना नेत्यांशिवाय पर्याय नसतो. या गोष्टी तुकाराम मुंडे कमी पडतात आणि नेत्यांशी समन्वय साधत नाहीत अशी तक्रार केली जाते.

करडी शिस्त
तुकाराम मुंडे यांच्याबद्दल त्यांच्या सहकारी अधिकार्यांच्या नेहमीच तक्रारी असतात. एखादा अधिकारी उशिरा आलाच तर त्या अधिकाऱ्यांचा हाफ डे लावणे, सुट्ट्या लावणे किंवा नोटीसा पाठवल्या जातात अशी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेकदा आंदोलन झाली आहेत. तरी देखील तुकाराम मुंडे त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिले आहेत. यामुळे त्यांना काम करताना त्यांच्या सहकाऱ्यांकडून पाहिजे तसा पाठिंबा मिळत नाही.

पंकजा मुंडेंचं ठरलं! अमित शाहांना भेटून पुढचा निर्णय घेण्याचे संकेत

प्रत्येकवेळी नियमांवर बोट
नियमांनी काम करणे चांगलेच आहे पण मुंडेंच्या बाबतीत असे होते की प्रत्येक गोष्ट नियमांप्रमाणेच होईल या एका विचाराने ते काम करत असतात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना हे त्रासदायक ठरतं. आपल्याकडे काही सरकारी नियम अत्यंत क्लिष्ट आहेत. यानियमांचा अधिकारी किंवा नेत्यांनाही त्रास होतो. अशावेळी तुकाराम मुंडे त्याच नियमांप्रमाणे काम करण्याचा हट्ट धरतात. त्यांच्या या हट्टामुळे अनेकवेळा ते काम रखडते किंवा सहज सोपी गोष्ट अवघड होते.

स्वयंकेंद्रीत कार्यशैली
तुकाराम मुंडेंची काम करण्याची पद्धत साधी सरळ आहे असे बोलले जाते. पण नियमांवर बोट ठेवणारी आहे. त्यामुळे असं बोललं जाते तुकाराम मुंडे फक्त स्वत: च्या तत्वांचा विचार करतात. प्रत्येक कामात आपली मर्जी चालवतात. हेकोखोरपण आपलं म्हणणं खरं करतात. असे त्यांच्यासोबतच्या अधिकारी बोलतात. त्यामुळे तुकाराम मुंडेंवर स्वयंकेंद्री असल्याचा आरोप होतो.

पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे निळवंडे धरण केलं असं होत नाही, बाळासाहेब थोरातांचा टोला

तुकाराम मुंडेंना त्यांच्या कार्यशैलीमुळे माध्यमात आणि लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली पण त्यांच्या याच कार्यशैलीने त्यांची 21 वेळा बदली झाली आहे. अवघ्या 18 वर्षाच्या कारकिर्दीत 21 वेळा बदल्या झाल्या आहेत. काही अधिकाऱ्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये देखील एवढ्या बदल्या होत नाहीत. तुकाराम मुंडेंची बदली चूक आहे का बरोबर हा तर प्रश्न आहेच. पण त्यांच्या या सततच्या बदलीचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर नक्कीच होतं असेल.

Tags

follow us