पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे निळवंडे धरण केलं असं होत नाही, बाळासाहेब थोरातांचा टोला

पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे निळवंडे धरण केलं असं होत नाही, बाळासाहेब थोरातांचा टोला

Balasaheb Thorat On Nilwande Dam : राजकीय संघर्षामध्ये अनेक वर्षांपासून अडकलेला निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत कालव्यात पाणी सोडण्याची पहिली चाचणी पार पडली. त्यानंतर मात्र निळवंडे धरणावरुन श्रेयवादाची लढाई (Battle of Credibility)सुरु झाल्याची दिसून येत आहे. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

याच मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांना पत्रकारांनी प्रश्न केला की, निळवंडे धरणावरुन श्रेयवाद सुरु झाला आहे, त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, खरंतर यामध्ये श्रेयवादाची लढाई करण्याचं काही कारण नाही. कारण श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न जरी केला तरी जनतेला माहित आहे की, जो लढा आमचा पिढ्यानं पिढ्या चाललेला होता, निळवंडे होण्यासाठी, त्यानंतर निळवंडे धरण सुरु झालं, त्यानंतर कोणी काम केलं निळवंडे धरणाचं हे जनतेनं रोज पाहिलेलं आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी निळवंडे धरण केलं, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

18 वर्षात 21 वेळा बदली, तुकाराम मुंडेंची अडचण कोणाला?

निळवंडे धरण ज्यांनी ज्यांनी केलं, त्याबाबतीतलं मी मान्य करतो की, मधुकर पिचड आज भाजपमध्ये आहेत तरीही मी सांगत असतो की, त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. माझ्या तालुक्यातलं खूप मोठं क्षेत्र निळवंडेमध्ये असल्यामुळे माझा तो ध्यासच होता, स्वप्नच होतं की, ते पूर्ण झालं पाहिजे, पाणी दुष्काळी भागाला मिळालं पाहिजे. त्यामुळे श्रेयवादाचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी तो केविलवाणा प्रयत्न ठरणार आहे.

थोरात म्हणाले की, खरंतर ते एकंदर पाणी 10 टीएमसी पाणी म्हणजे एखाद्या धरणाइतकं पाणी असतानाही ते सोडलं नाही. शेवटी त्याची मला मागणी करावी लागली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते करायचं म्हणून आम्हीही काही बोललो नाही की चला पंतप्रधान येणार असतील तर काही हरकत नाही, असं आम्हाला वाटत होतं.

Joe Root Test Record: रूटने मोडला सचिनचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

आता शेवटी पाहीलं तर आज तयारी कशी केली पाहिजे, तर आज चाचणीमध्ये अडचणी येत आहेत. ही चाचणी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केली असती तर उन्हाळ्यामध्ये सर्व दुष्काळी भागाला पाणी मिळालं असतं. आणि त्यांना मोठी मदत पुढच्या वर्षीदेखील झाली असती पण दुर्देवाने तसं नियोजन काही झालं नाही. आणि त्याचा परिणाम आज चाचणीमध्येच अडचणी येत आहेत.

आज पाणी चालू केलं पुन्हा बंद केलं असं काही सुरु आहे. असं असलं तरी श्रेयवादाच्या लढाईमध्ये आपण काही जास्त भाग घेत नाही जनतेला पूर्णपणे माहित आहे, सर्वांना माहित आहे की, निळवंडेसाठी कोणी आग्रह धरला,कोणी प्रयत्न केला आणि कोणी मदत केली? ते सर्वांना माहित आहे.

निळवंडे होणं आमच्या जीवनाचा ध्यास होता, स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं आहे, याचाच आम्हाला जास्त आनंद आहे असेही यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube