नाशिकचे आयजी बदलले, कृ्ष्ण प्रकाश, लखमी गौतम, मनोज शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले असून नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

Mahrashtra Kesari 2026

Mahrashtra Kesari 2026

Transfers of Several Senior Officers : महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने जरी केले आहेत. या बदल्यांमुळे राज्यातील अनेक महत्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक फोर्स वन म्हणून कार्यरत असलेले कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण या पदावर बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र म्हणून काम पाहणारे दत्त कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रशिक्षण विभागातील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बृहमुंबईमधील पोलीस सहआयुक्त गुन्हे म्हणून कार्यरत असलेले लखमी गौतम यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य या महत्वाच्या पदावर बदली झाली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था म्हणून कार्यरत असलेले मनोज शर्मा यांची मुंबई पोलीस दलात पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक नियोजन व समन्वय या पदावर कार्यरत असलेले सुहेल हक यांची मुंबई पोलीस दलात पोलीस सहआयुक्त प्रशासन म्हणून बदली करण्यात आली आहे.

ब्रेकिंग : खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली; कराळेंचीही बदली

मुंबईच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त महेश पाटील यांना पदोन्नती देत विशेष पोलीस महानिरीक्षक नियोजन व समन्वय या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मुंबईतील अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले परमजित दहिया यांची पदोन्नती करून त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकातील विशेष पोलीस महानिरीक्षक सी. के. मीना यांची कोकण परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. तर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना पुणे शहरात पोलीस सहआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

पुणे शहरातील पोलीस सहआयुक्त रंजन शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची गुन्हे अन्वेषण विभाग पूर्व येथे बदली करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले राजेश प्रधान यांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस सहआयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त विशीथ मिश्रा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील पोलीस सहआयुक्त प्रशासन जय कुमार यांची विशेष पोलीस महानिरीक्षक फोर्स वन या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त संजय येडपुरे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा म्हणून बदली झाली आहे. ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांना इन सिटू प्रमोशन देण्यात आले आहे. नवी मुंबईचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना पदोन्नती देत पोलीस सहआयुक्त नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सरकारला किंमत मोजावी लागणार; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, फडणवीसांवर गंभीर आरोप

ठाणे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांची विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस गृहनिर्माण महामंडळ येथे बदली करण्यात आली आहे. ठाणे प्रशासन विभागाचे अपर पोलीस आयुक्त एस. व्ही. पाठक यांची विशेष पोलीस महानिरीक्षक आर्थिक गुन्हे, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांची नियंत्रक वैधमापन या पदावर नियुक्ती झाली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्योती प्रिया सिंग यांची विशेष पोलीस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक येथे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त अनिल कुंभारे यांची मुंबई गुन्हे शाखेत पोलीस सहआयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर मुंबई कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त सत्य नारायण चौधरी यांच्याकडे मुंबई वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, 2022 तुकडीतील कनिष्ठ समय श्रेणीतील आयपीएस अधिकाऱ्यांना देखील वरिष्ठ समय श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील जतुर येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले जीवन देवाशिष बेनीवाल यांची पुणे शहरात पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे कार्यरत शुभम कुमार यांची पुणे ग्रामीणमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे कार्यरत वृष्टी जैन यांची सोलापूर शहरात पोलीस उपआयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कार्यरत हर्षवर्धन यांची गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version