Download App

Terrible Accident : करंजी घाटात भीषण अपघात, ट्र्क थेट दरीत कोसळला

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Accident : नगर- पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर एक ट्रक खोल दरीत कोसळुन झालेल्या अपघातात ड्रायव्हर जागीच ठार झाला. (Ahmednagar Accident ) या अपघातात सुदैवाने ट्रकचा क्लिनर बचावला आहे. (Ahmednagar Police)

Odisha Train Accident : बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर शवगृह बनलेल्या ‘त्या’ शाळांवर हातोडा

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील (Karanji Ghat) माणिकपीर बाबाच्या अवघड वळणावर नगरकडुन खताच्या गोण्या घेवुन येणारा ट्रक (नं. एम.एच.-०९-बीसी-७७७२) आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान करंजी घाटातील या अवघड वळणावरुन खोल दरीत कोसळुन झालेल्या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर जागीच ठार झाला आहे.

https://www.youtube.com/watch?v=2FGlSR_jGzc

दरम्यान याच वळणावर यापूर्वीही अनेकदा अपघात झाले आहे. तसेच मोठी जीवितहानी देखील या वळणक्षेत्रावर झालेली आहे. याआधी देखील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे शनिवारी सकाळी नगरकडून पाथर्डीकडे जात असतांना चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने हा टँकर घाटातील दरीत जाऊन कोसळला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून टँकरचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Tags

follow us