जरांगेंनी दोन वर्षांपूर्वीची क्लिप आताच का दाखवली? रामदास कदमांचा सवाल

Ramdas Kadam on Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगेंनाच सवाल केला.

Ramdas Kadam on Manoj Jarange Audio Clip

Ramdas Kadam on Manoj Jarange Audio Clip: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या आरोपांवरून कथित ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) नेते रामदास कदम यांनी जरांगे यांना सवाल केले आहेत. जरांगे यांनी दाखवलेली क्लिप 14 ऑक्टोबर 2024 रोजीची असल्याचा दावा करत, ही क्लिप इतके दिवस का ठेवली, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणाची चौकशी करून क्लिपमधील महिलेची ओळख समोर आणावी आणि 500 कोटींच्या दाव्याचा छडा लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

क्लिप ऐकवल्यानंतर जरांगे संतापले! “फडणवीस साहेब, क्लिपमधील लोकांचा तुम्ही शोध घ्या, नाहीतर यात तुमचा हात आहे, असं समजू”

जरांगेंनी क्लिप दोन वर्षे का ठेवली?

“मनोज जरांगे पाटील आज तुम्ही जी क्लिप दाखवली ती 14/10/2024 ची आहे. तुम्ही ही क्लिप दोन वर्ष का ठेवली, दोन अडीच वर्ष का थांबला होतात. ही क्लिप एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच होती का? आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री आहेत, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचं योगदान आहे. जरांगे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या बाजुला उभे राहीले पाहीजे. आम्ही आता असं म्हाणायचं का? आमचा मराठा समाजाचा नेताच मराठा नेत्याला संपवतो आहे”, असे रामदास कदम म्हणाले.

सामायिक 7/12 जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती अनिवार्य, फसवणूक रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

“आज ही क्लिप का बाहेर पाडली, आज जी क्लिप आली त्यात भाजपचा वरिष्ठ नेता कोणीही नाही, उद्या कोणीही बोलू शकतो हजारो कोटी दिले”, असेही कदम म्हणाले.

गुप्त बैठकींचा उल्लेख करत कदमांची नाराजी

या प्रकरणावर बोलताना रामदास कदम यांनी सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर अभ्यासासंदर्भात झालेल्या चर्चांचा आणि गुप्त बैठकांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “विनोद पाटीलला विचारून घ्या. सर्वोच्च न्यायालयाचा कायदेशीर अभ्यासाबाबत चर्चा कोणाच्या बंगल्यावर झाल्या. तुम्ही तुमच्या गुप्त बैठकीत बोललात या बैठकीत एकनाथ शिंदे यांचे चमचे बसले आहेत, त्यावेळी इंगळे बोलले की हे योग्य नाही. त्या बैठकीत भाजपचा आमदारही होता. चमचे बसले असं बोलल्यामुळे मला खुप वाईट वाटलं. आज तुम्ही एकनाथजी बोललात, देवेंद्र फडणवीस बोलतात, मला मनापासून बरं वाटलं”. असे रामदास कदम म्हणाले.

‘500 कोटींच्या मुद्द्याचा छडा लावलाच पाहिजे’

कथित ऑडिओ क्लिपची चौकशी करून त्यातील महिलेची ओळख समोर आणण्याची मागणी रामदास कदम यांनी केली. कदम म्हणाले, “माझी मागणी आहे की, या क्लिपची चौकशी झाली पाहीजे. ही महिला कोण आहे, हे पुढे आलं पाहीजे, 500 कोटीचा मद्द्याचा छडा लावलाच पाहिजे. या क्लिपची चौकशी झाली तर सगळ्या गोष्टी पुढे येतील.

लेखी तक्रार करणार

या प्रकरणी आपण लेखी तक्रार करणार असून एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. “आज मी लेखी तक्रार करणार आहे. मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे, असे कमद म्हणाले.

मोठी बातमी: जरांगेनी भाजप नेत्याची ऑडिओ क्लिप ऐकवली; महाराष्ट्राला हादरा देऊन सोडणारे पुरावे जरांगे घेऊन हजर!

दरम्यान, कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख स्वतंत्रपणे पडताळली जाणं महत्त्वाचं आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us