Tukaram Mundhe now turns his stern gaze to bus stations Sambhajinagars Sillod canteen sealed : राज्यातील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर विभागाच्या कारवायांना वेग आल्याचे दिसत आहे. आता बसस्थानकांवरील कॅन्टीनचीही तपासणी केली जात असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड एसटी डेपोमधील कॅन्टीनवर FDAने कारवाई केली आहे.‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत कॅन्टीनमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना निलंबित करून तेथील व्यवसाय बंद करण्याची कारवाई केली.
स्वयंपाकघरापासून पाण्याच्या तपासणीपर्यंत त्रुटी
तपासणीदरम्यान कॅन्टीनची फरशी आणि स्वयंपाकघर अस्वच्छ असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी भिंतींचे पापुद्रे निघाले होते. खिडक्यांना संरक्षणात्मक जाळ्यांची व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले. कॅन्टीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेचा तपासणी अहवाल उपलब्ध नसल्याचेही समोर आले. अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. तसेच कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन आणि हातमोजे यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने नसल्याचे तपासणीत आढळले.
‘अधिकाररूपी तलवार डास मारण्यासाठी वापरता का?’; कॅडिला प्रकरणात हायकोर्टाचे FDA वर ताशेरे
अन्नपदार्थांच्या खरेदीशी संबंधित नोंदी अपूर्ण असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळले. चणाडाळीच्या साठ्याबाबतही आवश्यक नोंदी ठेवण्यात आलेल्या नव्हत्या.याशिवाय कॅन्टीनमधील नियमित साफसफाई तसेच कीटक नियंत्रणाबाबतचे रेकॉर्डही उपलब्ध नसल्याचे समोर आले. अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन न झाल्याने प्रशासनाने या कॅन्टीनविरोधात कठोर पाऊल उचलले.सिल्लोड एसटी डेपोतील कॅन्टीनचा परवाना तातडीने निलंबित करून कॅन्टीन बंद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आता राज्यातील इतर बसस्थानकांवरील कॅन्टीन चालकांचेही लक्ष FDAच्या तपासणीकडे लागले आहे.
पालघरमधील तरुणीवर सहा जणांकडून लैंगिक अत्याचार; तीघांना अटक
काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील चायनीज स्टॉल्सचीही तपासणी करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता बसस्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवरही प्रशासनाचे लक्ष असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यात अन्न भेसळीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्या आहेत.दूध, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात केवळ नियमित कारवाई न करता, गरज भासल्यास संघटित गुन्हेगारीच्या तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ब्रॅड पिटने दिले ‘हार्ट ऑफ द बीस्ट’च्या कथानकाचे संकेत; म्हणाला, ‘ही एक…
नागरिकांच्या आरोग्याशी तसेच विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या.राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, यासाठी तपासणी आणि कारवाईची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
