Download App

जातीच्या विळख्यात न अडकता काम करणाऱ्या राणाजगजितसिंह पाटलांना सहकार्य करा -नितीन गडकरी

आपल्या भविष्याचा व्यापक विचार करणारा, आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी तळमळीने काम करणारा

  • Written By: Last Updated:

Nitin Gadkari Sabha for Ranajagjitsinh Patil :  तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार दौरा सध्या सुरू आहे. त्यांनी तुळजापूर तालुक्यात डोअर टू डोअर असा दौरा सध्या करत आहेत. त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबाही भेटत आहे. त्यामुळे सध्या राणाजगजितसिंह पाटील (Nitin Gadkari ) यांनी प्रचाराचा धडाका लावला असल्याचं दिसतं आहे. दरम्यान, आज भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी सभा घेतली आहे.

आपल्या भविष्याचा व्यापक विचार करणारा, आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी तळमळीने काम करणारा, व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून काम करणारा, आपल्या जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबध्दता असणारे आपल्या मतदारसंघाचे उमेदवार आहेत. तुळजापूर आणि परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांसह या भागाचा कायापालट करण्याची अफाट क्षमता त्यांच्यात आहे. अशा कार्यक्षम आणि आपल्या मतदार संघासाठी कटिबध्द असलेल्या राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलत होते.

तालुक्याचा अन् नळदुर्गचा कायापालट करायचा आहे, सर्वांनी सहकार्य करावं ; राणाजगजितसिंह पाटील यांचं आवाहन

आपण कधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जात विचारली का?, आपण कधी राजश्री शाहू महाराजांची जात विचारली का? आपण कधी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकडोजी महाराज यांची जात कधी विचारली का? असा प्रश्न उपस्थित करत या जातीच्या विळख्यात आपण अडकू नये असं आवाहनही नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. जो व्यक्ती आपल्या भागाचा विकास करेल, शेतकऱ्यांची चिंता करेल त्याच्या पाठीमागं आपण उभ राहिलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.

शेतकर्‍यांना कर्जमाफी, वीजबिल माफी महायुती सरकारनेच दिली. मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले, लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रूपये लाभाची योजना सुरू केली. त्यामुळे विरोधकांना अडीच वर्षात महायुती सरकारने काय केले, हे विचारण्याचा नैतीक अधिकार राहिला नाही. नळदुर्गला बसवसृष्टी उभारली जात आहे, तुळजापुरात अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक, बौध्द विहार, नळदुर्ग येथे शादीखान्याचे भूमिपूजन केले. अशा अनेक महत्त्वपूर्ण विकास जिल्ह्यात घडत आहेत असं मत राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलं.

 

follow us