twist in Dr. Valsangkar case, suspect’s daughter-in-law Dr. Shonali missing : सोलापूरातील प्रसिद्ध मेंदूविकास तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या (Dr Shirish Valsangarkar) आत्महत्येचा घटनेला पंधराहून अधिक दिवस उलटले आहेत. परंतु, अजूनही या प्रकरणामध्ये विविध ट्विस्ट येत आहेत. त्यात आता आणखी मोठा ट्विस्ट आला आहे. तो ज्या सूनेवर संशयाची सूई फिरत होती. त्या डॉ. शोनाली गायब झाली आहे. त्या वडिलांसह परदेशात गेल्याच्या चर्चा आहेत.
नेमकं काय घडलं?
पहिल्याच दिवशी सहा तासांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. डॉ. शोनाली वळसंगकर या स्वतःही सोलापुरातील डीएनबी न्युरोसर्जन आहेत. सासऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली असून, तपास गोपनीय ठेवण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून या डॉ. शोनाली या त्यांच्या वडिलांसह गायब असल्याचं बोललं जात आहे. त्या परदेशात गेल्याचं सांगितलं जात आहे.
VIDEO : प्रशासन झोपलंय का? अवैध वाळू तस्करांचा पाठलाग करत आमदार अमोल खताळ यांची धडक कारवाई
मात्र पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान वळसंगकरांच्या घरातील सर्वांचीच चौकशी सुरू आहे. त्यात वळसंगकर यांच्या सून डॉ. शोनाली यांचा भाऊ अमेरिकेत रागत असल्याने त्या डॉ. शोनाली गायब झाली आहे. त्या वडिलांसह परदेशात गेल्याच्या चर्चा आहेत. तसेच त्या आगामी काळात मुंबईला स्थायिक होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तसेच रूग्णालयातील स्टाफने त्या ओपीडी पाहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रचंड ट्विस्ट येत असल्याने तपासामध्ये अडचणी येत आहेत.
मोठी बातमी! खन्नांची निवृत्ती… आता वक्फ दुरुस्ती प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बीआर गवई खंडपीठाकडे
डॉ. शोनाली वळसंगकर या स्वतःही सोलापुरातील डीएनबी न्युरोसर्जन आहेत. सासऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली असून, तपास गोपनीय ठेवण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर पोलीस तपास अधिक गडद होत असून, आत्महत्येमागील कारणे शोधण्यासाठी सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग करण्याचाही विचार केला जात आहे.
शाल टॉवेल इतकीच आणली का?, ‘महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ उद्घाटनात अजित पवारांची टोलेबाजी
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हे केवळ नैराश्य नव्हे, तर सतत होणाऱ्या छळामुळे घेतलेलं पाऊल असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व संबंधितांची चौकशी सुरु केली आहे. सुनेची चौकशी या आरोपांची पुष्टी करणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.