एसी दुरूस्तीचा बहाणा अन् बंदुकीचा धाक, सून-सासऱ्यांना बाथरूममध्ये कोंडून दरोड्याचा प्रयत्न

Attempted robbery by locking daughter-in-law and father-in-law in bathroom under pretext of AC repair and threat of gun : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये आता चक्क एसी दुरूस्त करण्याच्या बहाणाने आलेल्या चौघांनी एक दिवसा ढवळ्या दरोडा टाकला आहे. तसेच या दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकाने दोघांना मारहाण केली. घरातील सर्व सामानाची उलथापालथ केली. ही घटना नाशिकच्या जेलरोड परिसरात घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
घटना नेमकी काय?
नाशिकमध्ये जेलरोड परिसरात भारत भूषण सोसायटीमध्ये आज 31 जुलै 2025 रोजी ही घटना घडली. येथे राहणाऱ्या रामदास गोविंद पगारे यांच्या घरात ते आणि त्यांची सून निलम पगारे हे दोघेच घरात असताना ही घटना घडली. यावेळी दोन हेल्मेट घातलेले व्यक्ती एसी दुरूस्त करण्याच्या बहाण्याने घरात घुसले. त्यांच्या मागोमाग आणखी दोघे बंदुकीसह घुसले.
तामिळनाडूत भाजपला दणका! CM स्टॅलिनची भेट अन् पन्नीरसेल्वम NDA तून बाहेर; काय घडलं?
या दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकाने पगारे सासरे अन् सुनेला घरातील दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तुंची माहिती मागितली. त्यावर त्यांनी सर्व काही बॅंकेत असल्याचं सांगितलं. त्यामुळए दरोडेखोरांनी या दोघा सून आणि सासऱ्यांना तोंडाला पट्ट्या बांधून मारहाण करत बाथरूममध्ये कोंडून ठेवलं. सर्व घर शोधलं सामान आस्ता विस्त केलं. मात्र घरात काहीच हाती न लागल्याने ते फरार झाले.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, संभाजीनगर परभणी रेल्वे लाईनसाठी 2,179 कोटी मंजूर
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाने घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर आता तपासाला सुरूवात झाली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच यातील एका दरोडखोराने त्याचे हेल्मेट जाता जाता गेटवर ठेवून गेला आहे. त्यातून पोलिसांना काही करू तपासात मदत होऊ शकते.