कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पुरुषाचे दोन पाय, सिम कार्ड; पोलिसांचा तपास अन् मैत्रीचा धक्कादायक शेवट

Pune Crime : पिंपरी - चिंचवडच्या पिंपळे गुरव येथील श्रीनगर गल्ली क्रमांक तीनमध्ये कचऱ्यात पुरुषाचे दोन पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.

Pune Crime

Pune Crime

Pune Crime : पिंपरी – चिंचवडच्या पिंपळे गुरव येथील श्रीनगर गल्ली क्रमांक तीनमध्ये कचऱ्यात पुरुषाचे दोन पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. तर आता पोलिसांनी या धक्कादायक घटनेचा अवघ्या 12 तासात तपासपूर्ण करत आरोपीला अटक केली आहे. तपासानुसार,अनिल खाडे (वय-50) असे या मृत व्यक्तीचे नाव असून दारुच्या नशेत वादातून विष्णू कुंभार याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे धड नवी सांगवीतील विनायकनगर गल्ली क्रमांक एक येथे घरात टाकलेले होते तर दोन पाय श्रीनगर गल्ली क्रमांक तीन समोर टाकण्यात आले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 6 नोव्हेंबर रोजी रामकृष्ण मंगल कार्यालय रोडवरील श्रीनगर गल्ली क्रमांक तीन येथे रस्त्याच्या कडेला कचऱ्यात पुरुषाचे दोन पाय आढळले होते. या प्रकरणात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासानुसार, अनिल खाडे आणि विष्णू कुंभार यांच्यात दारुच्या नशेत सुरुवातीला बाचाबाची झाली आणि नंतर दारुच्या नशेत विष्णू कुंभार याने अनिल खाडेची हत्या केली.

या धक्कादायक घटनेबाबत माहिती देताना सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी म्हणाले की, 6 नोव्हेंबर रोजी पिंपळे गुरन लेन नंबर तीन येथून 112 ला एक कॉल झाला होता. कचऱ्याच्या ढिगामध्ये पुरुषाचे पाय मिळालेले असल्याची माहिती कॉलवर देण्यात आली होती. या कॉलनंतर तात्काळ घटनास्थळी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह पोलीस पोहचले होते.

घटनास्थळी महानगरपालिकेचे कर्मचारी होते, ते कचरा काढत होते आणि त्यांना तिथे दोन पाय एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी बॉडीचे दुसरे अवयव डॉग स्कॉडच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या गोणीमध्ये पाय आढळून आले होते ती गोणी चेक केली असता गोणीमध्ये पोलिसांना एक सिम कार्ड मिळाला. सिम कार्डची चौकशी केली असता तो एक ठेकेदाराच्या नावाने होता. पोलिसांनी त्या ठेकेदाराची चौकशी केली असता अनिल खाडे नावाचा माझा कामगार असून त्याला सिम कार्ड वापरण्यासाठी दिला असल्याची माहिती ठेकेदाराने दिली.

MPSC विद्यार्थ्यांसाठी दिवाळी गिफ्ट; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्या वाढली-

या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिल खाडेच्या कुटुंबियांचा शोध घेत असताना पोलिसांना अनिल खाडेचा मुलगा आणि पत्नीची माहिती मिळाली. मात्र खाडे दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नसल्याने त्यांना अनिल खाडेचे पाय ओळखता आले नाही. अनिल खाडेच्या मोबाईमध्ये असणाऱ्या फोटोमधील पाय आणि पोलिसांना घटनास्थळी मिळालेले पाय 80 टक्के मिळते जुळते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी खाडेच्या मित्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता खाडे विष्णू कुंभारसबोत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विष्णू कुंभारच्या घरामध्ये पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता घरात पायाशिवाय बॉडी सापडली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिली.

Exit mobile version