Accident in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शुक्रवार (दि. 4 जुलै) रोजी एक भीषण अपघाताची घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. काळा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. (Accident) एका भरधाव कारने दर्शनासाठी आलेल्या ५-६ जणांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लोकांना बेधुंद कार चालकाने मृत्यूच्या दारात ढकललं.
एका वेगवान कारने निष्पाप नागरिकांना चिरडले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही लोकांना कारने धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोन लोकांचा जागेवरच मृत्यू झाला. “मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोघांचा यात जागीच मृत्यू झाला,” असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. इतर ४ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
केबिनमध्ये बोलावून, बीड विनयभंग प्रकरणातल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघात नेमका कसा झाला हे दिसत आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या कोणी कल्पनाही केली नसेल असा काही अपघात घडेल. ज्येष्ठ लोक नेहमीप्रमाणे सकाळी मंदिरात येत होते. अचानक त्यांच्यासोबत हे घडलं, इतकंच नाहीतर गणपती मंदिराच्या पायऱ्यांवर एक महिला चप्पल स्टँडजवळ चप्पल काढत होती. त्यावेळी पापणी लवत नाही तोवर कार तिच्या अंगावर चढली. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अपघात झाला त्यावेळी तिथ उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकला. कारण काही मिनिटांआधी ते लोकसुद्धा त्याच रस्त्यावरून आले होते. अपघातावेळी जे लोक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी यांचाही नंबर लागला असता. सुदैवाने जास्त लोक मृत्यूमुखी पडले नाहीत, पण दोन जणांना आपले प्राण गमवावे लागेल. कार चालक मद्यधुंद अवस्थेत चालवत होता का? ब्रेक ऐवजी त्याने ॲक्सिलरेटर दाबला गेला याचा तपास पोलीस करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. काळा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. एका भरधाव कारने दर्शनासाठी आलेल्या ५-६ जणांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. #ChhatrapatiSambhajinagaraccident pic.twitter.com/ftKOymkOtZ
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 4, 2025