Download App

Chandrashekhar Bawankule : अबब! राज्यात तब्बल दोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जाणार

Chandrashekhar Bawankule : राज्यात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) राहणार, त्यामुळे

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule : राज्यात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) राहणार, त्यामुळे राज्यात 1 लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद नसणार तर त्यांना 13 ते 14 विशेष अधिकार देण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री बावनकुळे यांनी दिली.

आतापर्यंत प्रत्येक 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने जीआर काढून प्रत्येक 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहे. विशेष म्हणजे आजच्या जीआरमुळे आतापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारीचे पद तात्काळ प्रभावाने रद्द होणार आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक केली जाणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री बावनकुळे यांनी दिली. तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये, विकासाच्या विषयांमध्ये, दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी आता काम करणार असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे तसेच प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आणि शासनाचा नवीन जीआर आल्यानंतर आताचे विशेष कार्यकारी अधिकार आहे त्यांचे पद रद्द होऊन नव्याने नियुक्त्या केल्या जातील. शासकीय योजनांसाठी ज्या काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे असणार आहे. तसेच विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळणार असून सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचे अधिकार त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.

राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या या नियमावलीत पात्रता निकष, जबाबदाऱ्या आणि निवड प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात येईल. तसेच, नियुक्त अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा प्रचार, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. सदर नियुक्ती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी शासननिर्धारित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

विशेष कार्यकारी अधिकारी होण्यासाठी पात्रता

विशेष कार्यकारी अधिकारी होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल.

वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी असावे.

ज्या तरुणांना, नागरिकांना सामाजिक कामांमध्ये रस आहे, त्या तरुणांना नागरिकांना यामध्ये संधी मिळणार

महसूल मंत्री राज्याच्या निवड समितीचे अध्यक्ष राहणार आहे.

विशेष कार्यकारी अधिकारी निवडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महसूल मंत्र्यांचे अध्यक्ष पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची समिती राहील.

कल्लाच! बड्स ब्लूटूथ शिवाय तर, हेडफोन वायरलेस होणार; सॅमसंगनं आणलेली भन्नाट टेक्नोलॉजी काय? 

follow us