Download App

“अपात्र झालो तरी A टू Z प्लॅन रेडी”! उदय सामंतांचा फुल कॉन्फिडन्समध्ये दावा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेचा निकाल आज (10 जानेवारी) जाहीर होणार आहे. संध्याकाळी चार वाजलेनंतर निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मंत्री उदय सामंत यांनी आपण अपात्र ठरणारच नाही, असा विश्वास व्यक्त करत त्याचे कारणही सांगितले. पण त्यानंतरही जर आपात्र ठरलोच तर आपला A टू Z प्लॅन तयार आहे, असा दावा केला. (Uday Samant said in full confidence that A to Z plan is ready even if disqualified in MLA Disqualification Case)

ABP माझाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ते बोलत होते. सामंत म्हणाले, मनात आजिबात धाकधूक नाही. कारण ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे शिवसेना कोणाची, धनुष्यबान कुणाचा त्यावेळी देखील आम्ही कागदपत्र खरे सादर केलेली होती. मी खरे याच्या खाली अंडरलाईन करतोय. सुप्रीम कोर्टामध्येही ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी देखील आम्ही खरे कागदपत्र सादर केले होते, आमची खरी भूमिका मांडली.

दुर्मिळ भीमथडी अश्वांना अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा…

परवा दिवशी सुनावणी झाली त्याच्यामध्ये मी एक भाग होतो. मला आश्चर्य आहे की माझ्याकडे एक लाल कागद दाखवला गेला आणि त्याच्यावर माझी सही होती आणि वर्षावर मीटिंगला बोलवले असा तो व्हीप होता. मी तिथं सन्माननीय विधानसभेचे अध्यक्षांना एक प्रश्न विचारला म्हणजे त्यांच्याशी चर्चा केली आणि जे विरोधातील वकील होते त्यांना देखील विचारलं की उद्या क्रिकेटची मॅच आहे तिकडे बघायला व्हीप काढालं, जेवणाचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम यासाठीही व्हीप काढालं, तर आम्ही जायचे का? त्यामुळे ‘वर्षावर मीटिंगला या’ हा व्हीप असू शकत नाही आणि त्याच्यावर खोटी सही देखील असू शकत नाही.

अशी जर खोटी कागदपत्र असतील तर ती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेले आहेत आणि म्हणून मला असे वाटते की आमची कागदपत्र हे खरी आहेत, आमची भूमिका ही खरी आहे. आम्ही सगळ्यांनी जी साक्ष दिलेली आहे ती देखील खरी आहे. त्याच्यामुळे आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची पूर्ण खात्री आहे. जर तुमचे आमदार अपात्र झाले तर पुढे काय? असा सवाल विचारला असता ते म्हणाले, इथे न्याय मिळेल ही अपेक्षाच आहे, कारण आम्ही काहीच खोटं केलेलं नाही.

…म्हणून पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण…

पण तरीही विरोधात निकाल गेला तरी ए बी सी डी इ एफ जी सगळे प्लान तयार आहेत. शेवटपर्यंत एकनाथ शिंदे सोबत राहणार आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात आहेत. सुखात दुखात ज्या ज्या वेळी एकनाथ शिंदेंना आवश्यकता भासेल त्या त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

follow us