Uday Samant : सावरकरांचा म्हणजे राहुल गांधींनी देशाचा अपमान केला

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा इतिहासाचा गंध नाही. वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ते जाहीरपणे अपमान करत आहेत. सावरकर यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाहीरपणे माफी मागावी. म्हणजे देश आणि पर्यायाने महाराष्ट्राची माफी मागितली, असे होईल, अशा खोचक शब्दात शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी […]

_LetsUpp

uday samant

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा इतिहासाचा गंध नाही. वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ते जाहीरपणे अपमान करत आहेत. सावरकर यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाहीरपणे माफी मागावी. म्हणजे देश आणि पर्यायाने महाराष्ट्राची माफी मागितली, असे होईल, अशा खोचक शब्दात शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

सावरकर यांचा इतिहास लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत. पण राहुल गांधी यांनी तो वाचलाच नाही. त्यामुळे सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान त्यांना माहितच नाही. इतिहासाचा कोणत्याही प्रकारचा गंध नसल्यामुळे राहुल गांधी सातत्याने बेताल वक्तव्य करत आहे, असा आरोप उदय सामंत यांनी केला.

Sanjay Shirsath अंधारेंची माझ्या बायकोने ओटी भरली… ठाकरे गटात जाण्यापूर्वी त्यांनी मला विचारले… – Letsupp

उदय सामंत म्हणाले की, राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करत आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे त्यावर बोलायला तयार नव्हते. परवा त्यांनी मालेगावच्या सभेत नुसते भाषणात आम्ही सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असे सांगितले. नुसते बोलून काय उपयोग उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस बरोबरच संबंध का नाही तोडत. नुसते सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप देखील उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Exit mobile version