Download App

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिल्लीत व्हावं, उदयनराजेंची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  • Written By: Last Updated:

छत्रपती शिवाजी महाराजांचा आज रायगडावर साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे.

या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते देखील रायगडावर दाखल झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रायगडावर दाखल हजार होते. छत्रपती उदयनराजे देखील रायगडावर आले होते.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशालाच नाहीतर जगाला दिशा देण्याचा काम केलं. अनेक लोक जगभरातून महाराजांवरती संशोधन करण्यासाठी देशात येत असतात. दिल्ली सारख्या ठिकाणी अनेक राष्ट्रपुरुषांचे स्मारक आहेत. त्याचा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक दिल्ली झालं पाहिजे असे यावेळी उदयनराजेनी मुखमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांना विनंती केली.

असेच पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले महाराष्ट शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकाशित करावा तसेच रायगडाच्या धर्तीवर प्रताप गडाचा देखील विकास करावा आणि युगपुरुषाबाबत आक्षेपार्य विधान तसेच लिखाण करणाऱ्या विरोधात एक कडक कायदा आणावा असे यावेळी बोलताना म्हणाले.

आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?

साडेतीन वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी या दिवशी आपला राज्याभिषेक पार पाडला, शिवाजी महाराजांना राजा म्हणून मिरवायचं नव्हतं पण रयतेच्या मनात जाणीव करून द्यायची होती. हे राज्य माझे नसून हे रयतेचे राज्य आहे.

असा विचार जगभरात शिवाजी महाराजांनी मांडला होता. महाराजांनी संपूर्ण अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. रयतेचा सहभाग राज्यकारभारात कसा झाला पाहिजे अशी संकल्पना महाराजांनी त्या काळात मांडली. त्याच आधारावर जगभरातील देश लोकशाहीच्या मार्गाने वाटचाल करत आहेत. असे देखील यावेळी उदयनराजे म्हणाले.

Tags

follow us