Download App

Uddhav Thackeray : ढेकणं मारायला गोळीबार करायचा नाही… चिरडून टाकायची!

रत्नागिरी (खेड) : शिवसेना नाव चोराल पण शिवसेनेचा (Shivsena) विचार चोरता येणार नाही. काहींना भरभरून दिले. पण ते सर्व खोक्यामध्ये बंद झाले आहेत. चोरलेलं धनुष्यबाण तुम्हाला पेलवणार नाही. इतिहास लक्षात ठेवा. रावण देखील धनुष्यबाण घेऊन उताणा पडला होता. त्यामुळे मिंधे गटाची देखील हिच अवस्था होणार आहे. आज गोळीबार मैदानात सभा होत आहे. पण ढेकणं चिरढायला आपल्याला गोळीबार करावा लागणार नाही. त्यांना तर येणाऱ्या निवडणुकीत ढेकणासारखं चिरडून टाकायचे आहे, अशी सडकून टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ४० गद्दार आमदारांवर (MLA) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह गेल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना यात्रेतील पहिलीच जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर तुफान हल्ला चढवला.

Prakash Ambedkar भाजप कोणालाही उचलतं अन् आत टाकतेय : सिसोदीयावर चार्ज काय?

माझे हात रिकामे आहेत. पण समोर बसलेली जनता बघितली की लढाईला बळ येते. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, एवढीच मागणी आहे. गल्लीतील कुत्रे देखील भाजपला विचारत नव्हतं. तेव्हापासून शिवसेनेने भाजपला मदत केली आहे. आणि तेच आमच्यावर उलटले आहेत, अशी टीका भाजपवर उद्धव ठाकरे यांनी केली.

मतदानाच्या दिवशी या ढेकणाला चिरडून टाकायचे आहे. गोळीबार मैदानात आजची आपली सभा होत आहे. पण मिंधे गटावर गोळीबार, तोफ चालवायची गरज नाही. कारण या मिंधे गटाची तेवढी लायकी नाही. त्यांना ढेकणासारखे चिरडून टाकायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कोकणातील जनतेला केले.

follow us