Prakash Ambedkar भाजप कोणालाही उचलतं अन् आत टाकतेय : सिसोदीयावर चार्ज काय?

Prakash Ambedkar भाजप कोणालाही उचलतं अन् आत टाकतेय : सिसोदीयावर चार्ज काय?

पुणे : देशात सध्या लोकशाही धोक्यात असल्याचे चित्र आहे. केंद्रातील भाजपचे सरकार मनमानी पद्धतीने काम करत आहे. आपल्याला अडचणीचे ठरणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. दिल्ली सरकारमधील आम आदमी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया (Manish Sisodiya) यांनाही अशाच पद्धतीने उचलून जेलमध्ये टाकण्यात आले आहे. कारण त्यांना अटक करण्यामागे काहीच कारण दिलेले नाही. मला तरी कोणत्याही वर्तमान पत्र अथवा वृत्तवाहिन्यावर अटक करण्यामागचे कारणच दिसले नाही. कोणत्या कारणाने अटक केली आहे. तो चार्ज काय, कलम काय हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळे मी म्हणतोय केंद्रातील भाजप सरकार हे कोणालाही उचलतं आणि आत मध्ये टाकत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

Prakash Ambedkar मोदी-शाहांना विचारा : टू जी घोट्याळातील आरोपी निर्दोष कसे?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकार सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करत असल्याचे गेल्या काही वर्षातील त्यांच्या कामावरून दिसून येते. नुकतीच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांना ज्या प्रकारे अटक केली आहे. ते पाहता केंद्र सरकार लोकशाही विरोधी वागत आहे. मनिष सिसोदीया यांच्या अटकेचे कारण आतापर्यंत मला तरी समजले नाही. तसेच मला त्यांना अटक करण्यामागे कोणतेही कारण अद्याप वाचण्यात आलेले नाही.

मनिष सिसोदीया यांच्यावर नेमका चार्ज काय आहे. हे तरी आधी सांगा. मनिष सिसोदीया यांनी पॉलिसी बदलली का, कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले म्हणून चार्ज लावलाय ते तरी किमान सांगा. अटक करण्यामागे काहीही कारण सांगत नाही आणि भाजप सरकार ज्याला पाहिजे त्याला उचलून आत मध्ये टाकत आहे, असेच चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे अटक करताना कशामुळे अटक करत हे सांगायला हवे. मग जनता सरकारला प्रश्न विचारू शकते, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी-शाह यांच्यावर टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube