विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या आठवड्यापासून सुरु झाले असले तरी उद्धव ठाकरे सभागृहात आले नव्हते. पण आज उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावली. त्यामुळे विधिमंडळाच्या या अधिवेशनात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आपली हजेरी लावली. आज दुपारी सुमारे दीडच्या सुमारास ते विधिमंडळात पोहोचले.
#WATCH | Maharashtra: Uddhav Thackeray arrives at Vidhan Bhavan in Mumbai. A meeting of leaders of Maha Vikas Aghadi is scheduled to be held today. He is arriving here for the first time after the commencement of this Budget session. pic.twitter.com/47METdrHJC
— ANI (@ANI) March 8, 2023
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यांनतर उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनासाठी सभागृहात काही काळ उपस्थिती लावली होती. पण त्यानंतर उद्धव ठाकरे विधिमंडळात गेले नव्हते. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्या निर्णयानंतर ते पहिल्यांदा विधिमंडळात आले आहेत.
हेही वाचा : BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं बनणार सरकार
आज विधिमंडळात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे याच बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात आजची महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.
आज उद्धव ठाकरे पक्ष, चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाविधिमंडळात गेले असले तरी सभागृहात मात्र गेले नाही. माध्यमांनी त्यांना त्या बद्दल विचारले असता गरज असल्यास सभागृहात जाणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पण त्यामुळे उद्धव ठाकरे आज विधीमंडळात आले पण सभागृहात गेले नाहीत.
दरम्यान उद्या राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला जाणार आहे. त्याआधी आज 2022-23 चा आर्थिक सर्वेक्षण (Economic survey) अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेत किती वाढ अपेक्षित आहे याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात 6.8 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2022-23 वर्षात सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 35 लाख 27 हजार 84 कोटी अपेक्षित असल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे.