Uddhav Thackeray : समाजवादी संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहिले होते. या राजकारणावर सत्ताधारी गटातील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. याच टीकेला आज ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. समाजवादी हे धर्मनिरपेक्ष तरीही वाजपेयींच्या सरकारमध्ये ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपाचे हिंदुत्व मिलावटीराम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे, असा खोचक सल्ला या लेखातून ठाकरे गटाने दिला आहे.
इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल. उचलली जीभ लावली टाळ्याला हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे. मिंध्यांनी पक्षांतर केले व ढोंगांतरही केले. त्यातून निर्माण झालेला माजवाद जनता कायमचा गाडेल, असा इशारा सत्ताधाऱ्यांना देण्यात आला आहे.
मराठा आरक्षण: अजित पवारांनी टोचले मनोज जरांगे पाटलांचे कान
मुख्यमंत्री शिंदे हे काही दिवसांचेच पाहुणे आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद जसे बेकायदा आहे तसे त्यांचे हिंदुत्व देखील ढोंगी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ढोंगांतर करून जे हिंदुत्व स्वीकारले ते बेगडी आहे. शिंदे आता म्हणतात, उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री आणखी बरेच काही बरळले. ते त्यांचे राजकीय वैफल्य आहे.
ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय, असा दिव्य संदेश यांच्या मिंध्या डोक्याने दिला. हिंदुत्वाचे मिलावटराम असा उल्लेख त्यांनी केला. यानिमित्ताने त्यांना राम आठवला हे बरेच झाले. अन्नात भेसळ करणाऱ्यांना जर हे महाशय मिलावटराम म्हणत असतील तर ज्यांनी तुमच्या ताटात आतापर्यंत सुग्रास जेवण वाढले ते जेवण ओरपून बेईमानी करणाऱ्यांना नमकहराम म्हटले पाहिजे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
Rohit Pawar : मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील, रोहित पवारांचा टोला
पाकिस्तान आणि हिंदुत्वाचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कठोर होती. जोपर्यंत काश्मिरातील हिंदुंचा रक्तपात थांबत नाही तोपर्यंत पाकड्यांचे पाय माझ्या देशात पडू देणार नाही, या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचा मिंध्यांना विसर पडलेला दिसतो. पाकड्यांचे स्वागत करणे, काश्मिरात पंडित आणि जवान मारले जात असताना तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसणे हे हिंदुत्व नसून नामर्दानगीच आहे. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या मिंध्यांना आता मोदी-शहांच्या नामस्मरणाचे व्यसन जडले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण, स्वतःला शिवसेना समजणाऱ्या या लोकांनी आपली प्रतिष्ठा भाजपचरणी ठेऊन गुलामगिरी पत्करल्याचे जाहीर केले आहे.