Rohit Pawar : मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील, रोहित पवारांचा टोला
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) हे येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना तसेच आमदारांना टोला लागावला. ते म्हणाले की, मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या संघर्ष यात्रेची माहिती देखील दिली.
एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील…
सध्या राज्यात असलेल्या शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदावरून तूतू मैंमैं सुरू झाली आहे. त्यात जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील वादावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पत्रकारांनी पत्र विचारला असता ते म्हणाले की, ‘आता ते मंत्री पदावरून तूतुमेमे करत आहेत. मात्र पुढे जाऊन एकमेकाच्या डोक्यात खुर्च्या देखील मारायला कमी करणार नाहीत.’
सुप्रिया सुळे होणार पुण्याच्या नव्या कारभारी! अजितदादांनंतर पवारांचा होल्ड पुन्हा मिळवणार?
दरम्यान येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. त्याअगोदर 24 तारखेला आशीर्वाद दिवस म्हणून आम्ही लाल महाल, फुले वाडा, लहूजी वस्ताद या ठिकाणी जाणार आहोत. येथे पवार साहेब युवा वर्गाला संबोधित करणार आहेत. तर आज 35 ते 40 लायब्ररी यांना भेट देणार आहे. युवांचा प्रश्न या यात्रेतून मांडणार आहे. आज पद जमीन या बाबत बोलले जाते पण युवकांच्या प्रश्ना वर बोलले जात नाही. असं यावेळी रोहित पवार म्हणाले.
फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आरक्षणाची आंदोलनं; 70 वर्ष प्रस्थापित मराठे गांजा ओढत होते का?
तसेच पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, सरकार युवकांच्या बाबतीत कोणतीही दाखल घेताना दिसत नाही. काही दिवसात कंत्राटी भरती झाली इथून पुढे पण होणार आहे. हे कंत्राट कोणाचे आहे? सगळे आमदार मंत्री यांचे पण चंद्रकांत पाटील यांच्याबाबत जे झाले ते योग्य नाही. आम्ही पण मोठे आंदोलन करू शकलो असतो पण तसे करत नाही.
तर शिंदे गटावर बोलताना म्हणाले की, कार्यकर्ते आणि मतदार त्यांच्याबरोबर राहणार नाही. त्यांना युवकांचे प्रश्न माहिती नाही. आता युवक रस्त्यावर उतरले आहेत. मतदानातून हे युवक त्यांना त्यांची जागा दाखवतील. तर मीरा बोरवणकर प्रकरणावर प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, मी बिल्डर क्षेत्रात नाही. मला एकच म्हणायचे आहे. जमीन कोणी कोणाला दिली याची चौकशी झाली पाहिजे.