सुप्रिया सुळे होणार पुण्याच्या नव्या कारभारी! अजितदादांनंतर पवारांचा होल्ड पुन्हा मिळवणार?

सुप्रिया सुळे होणार पुण्याच्या नव्या कारभारी! अजितदादांनंतर पवारांचा होल्ड पुन्हा मिळवणार?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आता आपण पुण्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले आहेत. “आतापर्यंत राष्ट्रवादीचे दोनच नेते पुण्यात लक्ष घालत होते, त्यामुळे मी खडकवासला सोडून कधी पुण्यात लक्ष घातले नाही. पण आता इथे बरेच कारभारी बदलले आहेत, त्यामुळे मलाही आता पुण्यात काम करावे लागेल. आज संघर्ष माझ्या वाट्याला आला आहे, त्यावर मात केल्याशिवाय राहणार नाही,” असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. (MP Supriya Sule has now indicated that she will be active in Pune politics)

पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्‌घाटन सुळे यांच्या हस्ते रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, माजी आमदार उल्हास पवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी अशा नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘अन्’ चिडलेल्या अजितदादांनी नकाशा फेकला… : माजी IPS मीरा बोरवणकर यांचे गंभीर आरोप

पुणे म्हणजे शरद पवार यांचा बालेकिल्ला :

पुणे जिल्हा हा खुद्द शरद पवार यांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा बालेकिल्ला संभाळला. त्यामुळे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक प्रकारे त्यांचे वर्चस्व तयार झाले आहे. अजितदादांचा वेगळा गट आणि चाहता वर्ग या जिल्ह्यात निर्माण झाला आहे. अनेक वर्ष त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले.

“पालकमंत्र्यांना ‘ते’ अधिकारच नाहीत!” बोरवणकरांच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचे प्रत्युत्तर

मात्र अजित पवार आणि पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांच्या बंडखोरीनंतर पुण्याचा बालेकिल्ला पवारांच्या हातातून काहीसा निसटला आणि अजितदादांच्याच हातात गेला. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 आमदारांपैकी शिरुरचे आमदार अशोक पवार वगळता सर्वच जण अजितदादांच्या गोटात गेले. आता हातातून निसटलेला हाच बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी, अजितदादांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी आणि त्यांची मोर्चेबांधणी करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube