Download App

VIDEO : मोदी सरकार हरलं! ट्रम्प टॅरिफपासून पाकिस्तानपर्यंत, उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून तोफ डागली

Uddhav Thackeray Criticize PM Modi On Trump Tarriff : दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी (India Aghadi Meeting) गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. डोनाल्ड ट्रम्प (Trump Tarriff) यांच्याशी संबंधित टॅरिफच्या मुद्द्यावरून त्यांनी भारत सरकारची परराष्ट्र नीती, पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भूमिका, तसेच उपराष्ट्रपतींच्या अचानक झालेल्या हटवणीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले.

देशाचं सरकार चालवतंय कोण?

ट्रम्प टॅरिफ हा प्रश्न देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आपण डोनाल्ड ट्रम्प यांना जाब विचारू शकत नाही. ट्रम्प आपल्या देशाची, पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत आहेत. त्यामुळे देशाचं सरकार चालवतंय कोण? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, उपराष्ट्रपती यांची गरज आहे. आजचे हे मंत्री भाजपचे आहेत. पंतप्रधान म्हणून असते, तर ते पहलगामला गेले असते, परंतु मोदी बिहारला गेले. भाजपचे हे सगळे प्रचारमंत्री आहेत. एकूणच ते असफल अन् असहाय्य आहेत. त्यांचं कोणतंही धोरण नाही. इंडिया आघाडीच्या (Maharashtra Politics) बैठकीसाठी ते दिल्लीत आहेत.

…तर स्पॉन्सरशीपसाठी रॅपिडोचं ब्लॅकमेलिंग सुरू होत; रोहित पवारांच्या निशाण्यावर प्रताप सरनाईक

मोदींचा मुखवटा

दोन तीन वर्ष जे शेतकरी दिल्लीला येत होते, त्यांना रोखलं गेलं. आठ-नऊ महिने शेतकरी मरत होते, त्यावेळी मोदींना शेतकऱ्यांची आठवण नाही आली. त्यांच्यावर बंदूक रोखण्यात आली, वाटेत भिंती बांधल्या, खिळे टाकले. त्यांना नक्षलवादी म्हटलंय. दिवसेंदिवस मोदींचा मुखवटा फाटत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

आता बीसीसीआयला प्रश्न विचारुच नका, सरकारने कायदाच बदलला; काय घडलं?

पाकिस्तान आपलं दुश्मन

अमेरिका डोळे वटारत असताना पंतप्रधान अन् परराष्ट्रमंत्री चिन, रशियाला जात आहेत. या सगळ्यात देशाची वाताहत होत आहे. परराष्ट्र नितीमध्ये अपयशी ठरलेलं सरकार असल्याची टीका ठाकरे यांनी केलीय. पाकिस्तान आपलं दुश्मन आहे. आम्ही दिल्लीत क्रिकेट सामना रोखला होता. सुषमा स्वराज देखील यासंदर्भात बोलल्या होत्या, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळता कामा नये. पण हे मतलबाचं बघतात, असा टोला ठाकरे यांनी मोदींनी लगावला आहे.

एकीकडे देशप्रेमाचे धडे देतात, अन् जय शहासोबत मंत्र्‍यांची पोरं दुबईला जावून पाकिस्तानचे क्रिकेटसामने बघतात. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवणार नाही, तोपर्यंत सच्चे देशभक्त होवू शकत नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

follow us