जय शाह यांचा फोन आल्यानंतर Uddhav Thackeray काय म्हणाले?

रत्नागिरी (खेड) : एके दिवशी भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांचा मला फोन आला आणि ते म्हटले की, उद्धवजी ‘कैसे करेंगे मुझे टेन्शन आया है’. आतापर्यंत तुमच्या वडिलांचा फोटो चोरला आहे. अन आता एकनाथ शिंदे हे माझ्या वडिलांना म्हणजे अमित शाह हे मला वडिलांसारखे असल्याचा म्हणत आहे. उद्या ते माझ्या प्रॉपर्टीत […]

Thackeray Shah

Thackeray Shah

रत्नागिरी (खेड) : एके दिवशी भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांचा मला फोन आला आणि ते म्हटले की, उद्धवजी ‘कैसे करेंगे मुझे टेन्शन आया है’. आतापर्यंत तुमच्या वडिलांचा फोटो चोरला आहे. अन आता एकनाथ शिंदे हे माझ्या वडिलांना म्हणजे अमित शाह हे मला वडिलांसारखे असल्याचा म्हणत आहे. उद्या ते माझ्या प्रॉपर्टीत हिस्सा तर मागणार नाही ना. त्यावर मी जय शाह यांना म्हटले घाबरू नका. कारण शिंदे यांना आणखी कोणकोण बाप वाटत आहे. त्याबद्दल दोन-चार दिवसात आणखी दोन-चार नावे वाढतील. त्यांना रोज नवनवीन बाप वाटतात. दुसऱ्यांचे बाप चोरणे म्हणजे वैचारिक वांझोटेपण आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह गेल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना यात्रेतील पहिलीच जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर तुफान हल्ला चढवला.

Eknath Shinde… म्हणून उद्धव ठाकरे रोज थयथयाट करतात!

उद्धव ठाकरे कोण आहे, काय आहे. तर उद्धव ठाकरेला शुन्य किंमत आहे. पण उद्धव ठाकरेचा मागे बाळासाहेब आहेत म्हणून किंमत आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह जेव्हा पुणे दौऱ्यावर असताना जय शाह यांचा आपल्याला फोन आल्याचे सांगितले. त्यावेळी जय शाह यांनी भीती व्यक्त केल्याचेही सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, दुसऱ्याचे बाप चोरणाऱ्यांना स्वतःच्या बापाचे नाव सांगायला लाज वाटत आहे. हे किती लाज आणणारं आहे. याला वैचारिक वांझोटेपणा म्हणतात.

Exit mobile version