Eknath Shinde… म्हणून उद्धव ठाकरे रोज थयथयाट करतात!

  • Written By: Published:
Eknath Shinde Uddhav Thackeray

मुंबई : आम्ही काम करत असल्याने विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह आम्हाला दिले आहे म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रोज थयथयाट करत आहेत. त्यांच्याकडे कोणीही मूळ शिवसैनिक राहिले नाही. म्हणूनच आमच्यावर टीका करत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला.

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह गेल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना यात्रेतील पहिलीच जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर तुफान हल्ला चढवला. त्याला प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Prakash Ambedkar मोदी-शाहांना विचारा : टू जी घोट्याळातील आरोपी निर्दोष कसे?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही काम करत असल्याने ते उद्धव ठाकरे यांना देखवत नाही. म्हणून ते रोज उठून थयथयाट करत आहे. आम्ही मुंबईमध्ये विकासकामे करत आहे. तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनाही उद्धव ठाकरे हे देशभक्त म्हणतील पण ते देशभक्त नाहीत. हे लक्षात घ्या.

Tags

follow us